spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तांब्याचे भांड्यातील पाण्याचे महत्त्व घ्या जाणून…

दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकत असतो. शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते.

दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकत असतो. शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्याच सोबत तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असते असेही आपण घरातील ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जाते. पण हे सर्व इतके जास्त महत्वाचे का ?

भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. तांब्याच्या भाड्यात कमीतकमी आठ तास ठेवलेले पाणीच लाभकारी असते. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. मग तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे ?

  • पचनसंस्थेला चालना मिळते :- पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्‍यांसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे, पोटातील जिवाणूंचा नाश होतो, जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो, परिणामी पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.

  • थायरॉइड :- आयोडीनच्या अति प्रमाणामुळे थायरॉक्सिन ट्रलथायरो आयोडीन या संप्रेरकाचे निर्माण आणि संतुलन बिघडते अन् हायपोथायरॉइडची स्थिती उद्भवते. थायरॉइडच्या प्रमुख लक्षणांमध्ये लकवर वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे. थायरॉइड एक्स्पर्ट मानतात की तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास हा आजार नियंत्रणात येतो. थायरॉईडच्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी तांब्यातील पाणी पिणे उपयुक्त ठरते. हार्मोनचा समतोल राखण्यासाठी असे पाणी उपयोगाचे असल्याने थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.
  • जखमा भरून काढण्यास मदत होते :- तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते, नवीन पेशींची निर्मीती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.
  • चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात :- जर तुम्ही पडणार्‍या अकाली सुरकुत्यांमुळे चितिंत असाल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी आता ही चिंता दूर करेल. कारण या पाण्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच चेहर्‍यावरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते.
  • हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करते :- ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’च्या ‘तांबं’ रक्तदाब, हृदयाचे ठोके आटोक्यात ठेवतो तसेच कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
  • सांधेदुखी दुर होते :- तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने, संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. याचबरोबर हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो.
  • त्वचा निरोगी ठेवण्यासाठी :- अनेकजण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा वापर करतात. त्यांचा असा समाज असतो की, चांगल्या प्रकारचे कॉस्मेटिक्स वापरल्याने त्वचा सुंदर होते, परंतु हे सत्य नाही. त्वचेवर सर्वात जास्त प्रभाव तुमच्या दिनचर्येचा आणि खानपानाचा पडतो. यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचा उजळेल.
  • सांधेदुखी :- आजकाल कमी वयातच अनेक लोकांना सांधेदुखीचा आजार होत आहे. तुम्हीही या आजारामुळे त्रस्त असाल तर दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो. तांब्याच्या भांड्यातील गुणामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखीमध्ये होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो.
  • पाचन क्रिया व्यवस्थित राहते :- अ‍ॅसिडिटी,गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. आयुर्वेदानुसार जर तुम्हाला शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची इच्छा असेल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी ८ तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे पाचन क्रिया व्यवस्थित राहते.
  • रक्ताची कमतरता :- अ‍ॅनिमिया किंवा रक्ताची कमतरता ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे ३० वयापेक्षा जास्त वयाच्या अधिक भारतीय महिला त्रस्त आहेत. कॉपरच्या बाबतीत हे तथ्य जास्त चकित करणारे आहे, की हे शरीरातील अधिकांश प्रक्रियेमध्ये खूप आवश्यक आहे. याच कारणामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
  • घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात :- तांब्याच्य भांड्यातील पाणी पिल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण मंडळानेदेखील तांब्याच्या जंतुनाशक गुणधर्माचा अभ्यास करून निर्जंतुकीकरणाची क्षमता असलेल्या घटकांत तांब या धातूचा समावेश केला आहे. या भांड्यातील पाणी पिल्याने डायरिया, अतिसार, कावीळ यासारख्या आजाराला कारणीभूत असलेले किटाणू नष्ट होतात.

असे अनेक फायदे तांब्याच्या भांड्यतील पाणी पिल्याने होतात.

 

हे ही वाचा :-

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2022: तारीख, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

जागतिक मधमाशी दिनानिमित्त जाणून घेऊया मध खाण्याचे फायदे

 

Latest Posts

Don't Miss