spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ढिचॅक दिवाळीच्या रेडकार्पेटवर मराठी कलकारांच्या नवनवीन लूकची आतषबाजी

स्टार प्रवाह ढिंचॅक दिवाळी २०२३- मराठी कलाकारांचा ढिंचॅक अंदाज

हिंदू धर्माशी निगडित लोकांसाठी दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, शुभ आणि लाभाची देवता श्री गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते जेणेकरुन त्यांचा आशिर्वाद कुटूंबावर राहो. वर्षभर त्यांचे घर सुख समृद्धीने भरून राहो.  यावर्षी हा पवित्र सण 12 नोव्हेंबर 2023 रोजी देश-विदेशात साजरा केला जाणार आहे.

यंदा स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार एकत्र येऊन ढिंचॅक दिवाळी साजरी करणार आहे. फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स यंदाची दिवाळी आणखी स्पेशल करणार आहेत. सध्या स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. याच निमित्ताने ढिंचॅक दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या आवडत्या पात्रांचा आजवर न पाहिलेला अंदाज पाहायला मिळेल. तुमच्या आवडत्या जोड्यांच्या रोमँटिक अंदाजासोबतच, खलानायिकांच्या दिलखेचक अदाही पाहायला मिळणार आहेत.

यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या दिवाळी स्पेशल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव, हर्षदा खानविलकर,विशाखा सुभेदार आणि रेश्मा शिंदे करणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली जाणार आहे.

तर या ढिंचॅक दिवाळीच्या रेडकार्पेटवर कलाकारांच्या नवनवीन लूकची आतषबाजी यावेळी पाहायला मिळाली,यावेळी येथे कलाकारांना म्हणजेच प्रत्येक मालिकेला एक-एक रंग देण्यात आला होता,जसं की हिरवा,पिवळा ,गुलाबी,निळा तर या रंगाचा कपडे परिधान करुन प्रत्येक मालिकेच्या टीमला या रेड कार्पेटवर उतरायचे होते, खरतर या सगळ्याच कलाकारांनी आपली आपली थीम उत्तम रीत्या फॉलो केली होती,अशरक्षा ,रेड कार्पेटवर दिवाळीचे फटाकेच फुटले होते असं म्हणायला हरकत नाही,कारण प्रत्येकाचा लूक हा आयटम बॉम,सुतळी बॉम,रस्सी बॉम असे अप्रतिम होते,खरतर दिवाळी असल्या कारणानं या सगळ्या कलाकारांना फटाक्यांची उपमा देत आहोत ,पण प्रत्यक्षात सगळेच खुप छान दिसत होते.यावेळी या कलाकारांनी येथे फराळाचा ही आस्वाद घेतला आहे.दरम्यान या कलाकारांनी दिवाळीचा संपुर्ण आंनद येथे घेतला आहे.

हे ही वाचा : 

प्रदूषणामुळे मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतोय, जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

काँग्रेसनं सट्टेबाजीचा पैसा निवडणुकीत वापरला – प्रवीण दरेकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss