spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदा संजय राऊत यांचा गणेशोत्सव तुरुंगात!

मुंबईच्या गोरेगाव येथील पात्रचळ आर्थिक घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे(Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay raut) हे आर्थर रोड तुरुंगात आहेत. यांना परत एकदा ईडीने धक्का दिला. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आता हि वाढ ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या जेलमध्ये बसून एक पुस्तक लिहित असल्याची माहिती देखील समोर येत आहे, परंतु कोणत्या विषयवार पुस्तक लिहित आहेत याबद्दल खुलासा झालेले नाही.

खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात ; बाळासाहेब थोरात आक्रमक

गेल्या महिन्यात संजय राऊत यांच्या भांडुपचा निवास्थानी ईडीने नऊ तास चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, राउतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी ईडीने पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच न्यायालयाच्या निर्देशानुसार राऊतांना घरचे जेवण दिले जाते. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने परवानगी द्यावी ही विनंती वकिलांनी केली असून आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना सूचना द्यावी, अशी विनंती करण्यात आली.

संजय राऊत यांच्या वकिलाने मेडिकल हिस्ट्रीचे कागदपत्रे सीएमओ चीफ मेडिकल ऑफिसर यांना सादर करण्याचे आदेश न्यायालयने दिले आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार की कोठडी याचा आज 22 ऑगस्ट निर्णय होणार होता, पण न्यायालयाने पुन्हा ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत कोठडी वाढवली.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

हेही वाचा : 

‘देवेंद्रजी और में हू साथ साथ, मेरा नाव है एकनाथ’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Latest Posts

Don't Miss