मराठी सिनेसृष्टीत सोनाली कुलकर्णीचा(sonali Kulkarni) अप्सरा म्हणुन विशेष ओळख आहे.‘नटरंग’, ‘मितवा’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनयाबरोबरच सोनालीने तिचं सौंदर्य आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते,ती तिचे नवनविन व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करत असते,आणि तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते,दरम्यान तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते पसंती देत असतात.
सध्या सोनाली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे,ती म्हणजे तिने आजच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक नविन अलिशान घर खरेदी केलं असल्याची आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. आहे.सध्या सोनाली तिच्या नवऱ्याबरोबर दुबईत दिवाळी साजरी करत आहे.तिच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.तिच्या चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील तिच्या मित्र मंडळींकडून देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरशी ७ मे २०२१ रोजी दुबईत लग्नगाठ बांधत तिच्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात केली. गेल्या महिन्यांपासून अभिनेत्री शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मुंबईत होती. परंतु, आता ती दिवाळी साजरी करण्यासाठी दुबईत पोहोचली आहे. सोनालीने दिवाळीसाठी खास पारंपरिक लूक करून फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसून,केसात गजरा माळलेला दिसून येत आहे,दरम्यान दुबईत राहुन देखील सोनालीने पांरपारिक रित्या सण साजरा केला आहे,अभिनेत्रीच्या फोटोंपेक्षा तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दुबईत नवीन घर खरेदी केल्याची गूडन्यूज सोनालीने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
दुबईतील नव्या आलिशान घरातील फोटो शेअर करत अभिनेत्रीने “पाडवा in the new होम” असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे. सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
सोनाली सध्या झिम्मा २ या चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे.लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सोनालीच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबतची उस्तुकत्ता पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा :
कोल्हापुरात रंगली म्हशी पळवण्याची स्पर्धा!
‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात दिसणार नम्रता संभेरावचा पती, नम्रतासाठी यंदाचा पाडवा खास