spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उत्तरेकडचं राजकारण महारष्ट्रात सुरु झालंय, परिस्तिथी गंभीर आहे, सभेत राज ठाकरेंचे सूचक व्यक्तव

सध्या महारष्ट्रातील राजकीय स्थित अस्थिर आहे. अडीज वर्षात जे घडलं ते चांगलं नव्हतं. फक्त निवडणुका सत्ताधारांच्या डोक्यात आहेत, कोण कुणासोबत आहे, हे कळतच नाही, आणि ही सत्तेची आणि आर्थिक जुळवणूक आहे. असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आज राज ठाकरेंनी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. यात राज ठाकरे पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल आहे. केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे मनसे आता स्थानिक पातळीपासून ते लोकसभेपर्यंतच्या तयारीला लागली असल्याचं चित्र आहे.

भारतातील पहिल्या महिला भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ ॲना मणी यांची १०४ वी जयंती

आजच्या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, माझा शस्त्रक्रियेचा अनुभव खूप भयंकर होता. माझ्या शस्त्रकियेला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. कोरोनामध्ये माझ्या हाडांचा आजार जास्त होत गेलं. त्यांनतर राज ठाकरे यांनी या सभेत शस्त्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती दिली.

जनतेनं शिवसेना आणि भाजपला प्रश्न विचारवे

राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. मनसे कधीही कुठलंही आंदोलन अपूर्ण सोडत नाही. टोलमुक्तीचे आश्वासन शिवसेना-भाजपचं होतं. पण याबाबत आंदोलन मात्र मनसेनी केलं. शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न याठिकाणी निर्माण होता, मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नाही. म्हणजेच हा टोलचा पैसा सगळ्या पक्षांना जातो, आणि म्हणून नेते टोलबाबत प्रश्न विचारत नाहीत, टोलबाबत कोणतीही उत्तर सरकारकडून मिळाली नाहीत. सत्ता हातात द्या, सगळे टोल बंद करतो, असंही यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

हेही वाचा : 

राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आता घटनापीठाकडे, पुढील सुनावणी २५ ऑगस्टला

Latest Posts

Don't Miss