spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

असे करा डाउनलोड जेईई ऍडव्हान्स परीक्षांचे ऍडमिट कार्ड

जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced) 2022 ची परीक्षा यावर्षी 28 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि, मुंबई (Indian Institute of Technology Bombay/IIT Bombay) ने जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced), 2022 चे प्रवेशपत्र जारी केले आहे. प्रवेशपत्रे आज, मंगळवार, 23 ऑगस्ट, 2022 रोजी ऑनलाइन पद्धतीने जारी करण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे आणि जे परीक्षांना बसणारं आहेत. ते आयआयटी बॉम्बेच्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात. आता ते डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रियेबद्दल…

परीक्षा या तारखेला होणार?
जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced) 2022 ची परीक्षा यावर्षी 28 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून देशभरातील नियुक्त केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. परीक्षा सकाळी 09 ते 12 आणि दुपारी 02 ते 05.30 या दोन शिफ्टमध्ये होणार आहे. त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख एंटर करून आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे. तसेच ही माहिती अर्जदारांच्या अर्जावर उपलब्ध आहे.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?
  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in ला भेट द्या.
  • होम पेजवरील ‘JEE Advanced Admit Card 2022’ या लिंकवर जा.
  • तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्या.
परीक्षा CBT मोडमध्ये घेतली जाईल.

जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced) परीक्षेद्वारे, यशस्वी विद्यार्थ्यांना देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. परीक्षा केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल. त्याच वेळी, जेईई मेन परीक्षेत रँक मिळवलेले उमेदवार या परीक्षेला बसतील.

हे ही वाचा:

सर्वांच्या लाडक्या लालबागच्या राज्याची अनोखी कहाणी…

आमदार अजय चौधरी यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss