spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींचा समचार घेतला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींचा समचार घेतला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडले. मेळाव्यात बोलताना त्यांनी राजकारणातील अनेक घडामोडींकडे लक्ष वेधले.

  • गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातील चर्चा सोशली मीडियावर रंगली असल्याची पाहायला मिळते. अनेक राजकीय नेत्यांमध्ये सोशल वॉर सुरू असतात. उत्तरेकडे राजकारण महाराष्ट्रत सुरू झाल आहे. जनतेन जागं होण्याची गरज आहे. बाकिच्य पक्षांमध्ये धुडगूस चालु देत पणा माझ्या पक्षात हे चालणार नाही. जर समजा पक्षातल्या पक्षात अंतर्गत एकमेकांविषयी जर कोणी फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरीत कॉमेंट केल्या तर त्याला एक क्षण भरही पक्षात ठेवणार नाही. तुमचे चोचले आत्तापर्यंत खुप पुरवले. झालं तेवढ खुप झालं. तुम्हाला तुमचं काम सांगायच असेल तर माध्यमांचा उपयोग करा. पण कोणी कोणाच्या विरोधात बोलं असेल तर त्याला माझ्यापर्यंत पोहचवा. माझ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  • नुपूर शर्मा जे बोलल्या ते योग्यच बोलल्या आहेत. मी शर्माची बाजू घेतली. आज असदुद्दीन ओवेसी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलतात त्यांना माफी मागायला का नाही लावत, झाकीर नाईकला वेगळा आणि नुपूर शर्माला यांना वेगळा न्याय का असाही सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
  • “राज्यात सध्याचं राजकीय वातावरण चांगल नाही. जनता जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यतं असच सुरु राहणार आहे. नेत्यांचया या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरु आहेत.त्यांना मते देणाऱ्यांची कमाल वाटते, असे म्हणत महाराष्ट्रात राजकारणाचा खेळखंडोबा मांडला आहे. असा हल्लाबोलही राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
  • मनसेच्या आंदोलनानंतर मशिदीवरचे भोंगे बंद झाले. यानंतर जवळपास ९२ टक्के ठिकाणांवरील भोंगे बंद झाले आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत कसे पोहचता हे महत्वाचं आहे. असे राज ठाकरे म्हणाले
  • मनसेने कोणतेही आंदोलन अर्धवट सोडले नाही. आपल्या आंदोलनामुळे राज्यातील ६५ टोलनाके बंद झाले. टोलमुक्त महाराष्ट्रचे आश्वासन देणाऱ्यांनी सत्तेत असताना आश्वासन पूर्ण का केले नाही, याबद्दल त्यांना विचारा. टोलचा पैसा सगळ्या पक्षांकडे जातो. असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

हे ही वाचा :- माझी तुलना गद्दारांशी करू नका – राज ठाकरे

  • महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण कधीच नव्हतं. हे राजकारण नाही. तात्पुरती आर्थिक अँडजेस्टमेंट आहे. २०१९ मध्ये मतदान केलेला मतदार आता संभ्रमात असेल, कोणाला मतदान केलंय. कोण, कोणासोबत आहे हेच कळत नसेल.
  • “मला पक्ष चिन्हाची आणि नावाची गरज नाही माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे त्या विचाराने मी पुढे जाणार” असं म्हणत शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. “वारसा हा वास्तूंचा नाही विचारांचा चालवावा लागतो. शिवाजी महाराजांनी जो विचार दिला तोच विचार पुढे पेशव्यांनी पसरवला पण कधी स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतलं नाही, त्यांचं म्हणणं होतं की छत्रपती तेच, आम्ही फक्त त्यांचा विचार पोहोचवतो, असंच माझं आहे, मीही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे.” असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला असून शिवसेनेवर बोचरी टीका केला आहे.
  • राजकारण गंभीर, पण सरकारला जनता जाब विचारत नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाने राजकारणात यावे

कोरोनामुळे हाडांचा त्रास बळावला, शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची पहिलीच सभा आहे. माझ्या शस्त्रक्रियेला 2 महिने पूर्ण झाले आहे. शस्त्रक्रियेचा अनुभव भयंकर होता असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. उद्या पुणे दौऱ्यावर जातोय. प्रवास करताना त्रास होतोय का ते बघतो असं ते म्हणाले.

हे ही वाचा :-

उत्तरेकडचं राजकारण महारष्ट्रात सुरु झालंय, परिस्तिथी गंभीर आहे, सभेत राज ठाकरेंचे सूचक व्यक्तव

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss