spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बहुचर्चित ‘शमशेरा’ चा नजरा खिळवून ठेवणारा ट्रेलर प्रदर्शित

शमशेरा हा सिनेमा हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. 22 जुलै रोजी हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘शमशेरा’ या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ‘शमशेरा’ (Shamshera) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारा ‘शमशेरा’ येत्या २१ जून ला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायाला मिळणार आहे. अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री वाणी कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच 1871 असं लिहिलेलं दिसत आहे. आझादी तुम्हे कोई देता नही’, ‘ये कहानी है शमशेरा की’ हा संवाद ऐकू येतो आणि लगेच रणबीर कपूर ची झलक पाहायला मिळते. त्यानंतर अभिनेत्री वाणी कपूर एका डान्सरच्या भूमिकेत आपल्याला दिसतेय. अभिनेता संजय दत्त शुद्ध सिंह या भूमिका दिसतो. ट्रेलरमधील रणबीर, वाणी आणि संजयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. ट्रेलरमधील हातात कुऱ्हाड घेतलेला रणबीर, वाणी आणि संजयच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सिनेमामध्ये अभिनेता रोनित रॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.

शमशेरा हा सिनेमा हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. 22 जुलै रोजी हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पुन्हा एकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

यशराज फिल्म्स ची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे. करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या सिनेमाची कथा 1800 च्या उत्तरार्धावर आधारित आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत. सिनेमाचे चित्रीकरण लडाखमध्ये करण्यात आलं आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss