spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणेशोत्सवानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महिनाअखेरीस होणार पगार

यंदाच्या वर्षी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन हे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. महिनाअखेर असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना राज्य कर्मचाऱ्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

यंदाच्या वर्षी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन हे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. महिनाअखेर असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना राज्य कर्मचाऱ्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच राज्य सरकारने ( Maharashtra Government ) ऑगस्ट महिन्याचा पगार तीन दिवस आधी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन वर्षानंतर कोरोनाचा (Corna) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा गणेशोत्सव निर्बंधांशिवाय साजरा होणार आहे. यावर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसंच हमीपत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा :-  विधिमंडळाच्या बाहेर झालेल्या गोंधळावर आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया 

ऑगस्ट महिन्याचा पगार २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने जीआर काढला आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच कोषगार नियम १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील तरतुदी शिथिल केल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी २९ ऑगस्ट रोजी म्हणजेच सोमवारी हा पगार / निवृत्ती वेतन मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार पुढील महिन्यात एक सप्टेंबर रोजी होतो. परंतु हा पगार आता ऑगस्ट महिन्यातच २९ तारखेला होणार आहे. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक (जीआर) काढलं आहे.

 

हे ही वाचा :-

फेसबुक अकाउंट हॅक झाले की बग? वापरकर्त्यांनी केल्या न्यूज फीड सेलिब्रिटी पोस्टसह स्पॅम झाल्याच्या तक्रारी

जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ चित्रपट पुन्हा परतणार थिएटरमध्ये; नवीन ट्रेलर झाला रिलीज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss