spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये गाजराचा हलवा

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा सगळ्याच लोकांना गाजराचा हलवा खूप आवडतो.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा सगळ्याच लोकांना गाजराचा हलवा खूप आवडतो. हिवाळा सुरू झाला की लाल चुटूक गाजर मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. ते गाजर किसून त्यात तूप, साखर दूध किंवा मावा, ड्रायफ्रूट घालून केलेला हा हलवा अतिशय चविष्ट लागतो. गाजर हे कोणत्याही सीजन मध्ये खाल्ले जाते. पण हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या लालचुटूक गाजरांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असते. व्हिटॅमिन ए डोळे, चांगली त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीबरोबरच अँटिऑक्सिडंट्साठी महत्वाचे आहे. चला पाहुयात घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये गाजराचा हलवा कसा करतात.

साहित्य:-
१ किलो गाजर
२ वाटी साखर
३ वाटी दूध
चवीनुसार वेलची पावडर
तूप
ड्रायफ्रूट्स

कृती:-

गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजराची साल काढून घ्या. त्यानंतर ते धुवून झाल्यानंतर किसून घ्या. किसून झाल्यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात ड्रायफ्रूट भाजून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार तूप घालून किसलेले गाजर टाकून नीट शिजवून घ्या. काही वेळाने गाजराचा रंग बदलेल आणि गाजर केशरी होईल. आता त्याच्यामध्ये ३ वाटी दूध घालून घ्या. दूध आटल्यानंतर त्यात २ वाटी साखर टाकून घ्या. साखर विरघळून मिश्रणाला घट्टपणा येईपर्यंत ते शिजवून घ्या. त्यानंतर त्याच्यावर वरून पुन्हा एकदा तूप सोडा. तूप सोडून झाल्यानंतर त्यामध्ये साजूक तूपात भाजलेले ड्राय फ्रुट्स मिक्स करा. तयार आहे आपला पौष्टिक व स्वादिष्ट गाजर हलवा.

हे ही वाचा:

भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरी ‘कोसला’ आता झळकणार पडद्यावर

कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या, नाना पटोलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss