spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डोळ्यांचा मेकअप करायचा ? तर हे नक्की वाचा

आताच्या आधुनिक युगात मेकअपची व्याख्या बदलली आहे. मेकअप हा प्रत्यतेकांसाठी आवश्‍यकच असतो अशी खात्री मुलींची झालेली आहे.

आताच्या आधुनिक युगात मेकअपची व्याख्या बदलली आहे. मेकअप हा प्रत्यतेकांसाठी आवश्‍यकच असतो अशी खात्री मुलींची झालेली आहे. प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे असं वाटतंच. परंतु मेकअप करताना आपल्याला नक्की कुठं जायचं हे लक्षात घेतले पाहिजे. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळपासून कडाक्याची थंडी असं काहीसं विचित्र वातावरण सध्या अनुभवायला मिळतंय. ऊन्हाच्या तुलनेत थंडीचा कडाका जरा अधिक असल्याने या दिवसात त्वचा कोरडी आणि शुष्क होते. रात्रीच्या वेळी पार्टीला वगैरे जायचे असेल तर, मेकअप हा गडद व चमकदार हवा, पण दिवसाची वेळ असेल तर मात्र मेकअप हलका व नैसर्गिकच असला पाहिजे. म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे :-

डोळ्यांचा मेकअप…

  • भुवयांचा आकार चेहऱ्याला अनुसरूनच करा. भुवयांना नैसर्गिक काळेपणा व दाटपणा येण्यासाठी आयब्रो पेन्सिल वापरा. डोळे सुदंर दिसण्यासाठी पापण्याच्या वर आयशॅडो लावा. पोशाख व तुमच्या रंगाशी मिळत्याजुळत्या आयशॅडोचाच वापर करा. वेळ प्रसंगानुरूप पावडर किंवा क्रीम स्वरूपातील आयशॅडो वापरा.
  • डोळ्यांच्या कडांसाठी आयलायनर वापरा. त्यामुळे डोळे टपोरे व सुंदर भासतात. आयलायनर पेन्सिल तसंच द्रवरूपही मिळतो ब्रशने आयलायनरची डोळ्यांच्या कोपऱ्याच्या आतल्या बाजूपासून पापण्यांच्या टोकापर्यंत एक पातळ रेषा काढा.
  • खालच्या बाजूला आयलायनर लावताना डोळ्यांच्या आतील कोपऱ्यांकडे पातळ रेषा काढा व बाहेरच्या दिशेने थोडी जाड रेषा काढा. आयलायनर तपकिरी, काळा, निळा, व हिरवा अशा चार रंगांत उपलब्ध आहे. तुमच्या बुबुळांच्या रंगाला अनुसरूनच आयलायनाचा रंग निवडा.
  • डोळ्यांच्या पापण्या काळ्या, लांब व घनदाट बनवण्यासाठी मस्कारा वापरा. मस्काराचा एक थर वाळल्यानंतर त्याचा सुरेख परिणाम मिळण्यासाठी आणखी एक थर लावा. आजकाल मस्कारा काळ्या, तपकिरी व निळ्या रंगामध्ये मिळू लागलाय. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या रंगानुरूपच मस्कारा वापरा.
  • डोळे टपोरे व छान दिसावे यासाठी विविध रंगात मिळणाऱ्या काजळाच्या पेन्सिलीने काजळ लावा.

हे ही वाचा :-

‘हड्डी’चा फर्स्ट लूक आऊट

गणेशोत्सवानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महिनाअखेरीस होणार पगार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss