spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दुपारी ऑफिसमध्ये येणारी झोप टाळण्यासासाठी उपाय…

रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेकवेळा आपल्याला स्वतःकडे बघायला वेळच मिळत नाही. कामाचे टेन्शन, घरचे टेन्शन त्यात रात्री धड झोपही लागत नाही.

रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेकवेळा आपल्याला स्वतःकडे बघायला वेळच मिळत नाही. कामाचे टेन्शन, घरचे टेन्शन त्यात रात्री धड झोपही लागत नाही. मग दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ही अपूर्ण झोप डोळे बंद करायला लावते. तसेच जेवण झाल्यावर शरीर जड होणे, आणि त्यामुळे झोप येणे ही अतिशय सामान्य बाब आहे. ऑफिसमध्येही जेवण झाल्यावर अनेकांना झोप येते. त्या वेळेस एखादी महत्त्वाची मिटिंग किंवा काम असेल तर अत्यंत त्रासदायक ठरते. अशावेळी आपण झोप घालवण्यासाठी आणि चटकन फ्रेश होण्यासाठी कॉफी घेणे पसंत करतो. तसेच हि झोप घालवण्यासाठी अनेक हेल्दी आणि परिणामकारक पर्याय उपलब्ध आहेत.

  • ऑफिसमध्ये दुपारची झोप आल्यास जागेवरून उठा, ऑफिस बाहेर पडा आणि जिने उतर – चढ करा.
  • लंच ब्रेकमध्ये ऑफिस बाहेर पडा आणि सूर्यप्रकाशात फिरा. सूर्यप्रकाशामुळे मूड, जागरूकता आणि मेटॅबॉलिझम सुधारतो. परिणामी आरोग्य चांगले होते.
  • संगीत ऐकल्याने कामाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसेच कामात लक्ष लागते.
  • सकाळी ऑफिसला आल्यापासून आपण बराच वेळ एकाच प्रकारचे काम करत असतो. ठराविक वेळाने वेगळे काम केले तर, आपल्याला कंटाळा येत नाही. त्यामुळे जेवण झाल्यावर कामाचे स्वरुप बदला.
  • जेवणानंतर लगेचच कामाच्या ठिकाणी बसणे टाळा. त्यामुळे जास्त झोप येते.
  • जेवणानंतर येणारी झोप जाण्यासाठी तोंडात एखादी गोळी किंवा च्युईंगम चघळल्यास झोप जाण्यास मदत होते. तोंडाची हालचाल झाल्याने आपण नकळत सक्रीय होतो. त्यामुळे झोप घालविण्यासाठी हाही एक उत्तम पर्याय आहे.
  • दुपारच्या जेवणात भरपूर खाल्ल्यास नक्कीच झोप येते. त्यामुळे हलके पदार्थ खा.
  • जमल्यास थंड पाण्याने चेहरा व डोळे स्वच्छ धुवा. यामुळे थकलेल्या डोळ्यांना आराम मिळेल आणि त्वचेचे पोर्स बंद होतील. म्हणून चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारा आणि मग चेहरा कोरडा करा.

हे ही वाचा :-

‘हड्डी’चा फर्स्ट लूक आऊट

अभिनेते अमिताभ बच्चन दुसऱ्यांना ठरले कोरोना पॉसिटीव्ह

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss