spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काल झालेल्या जोरदार वादानंतर, आज पुन्हा रंगणार अधिवेशनाचा शेवटचा दिवस

राज्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) हे १७ ऑगस्ट पासून चालू झाले आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस रंगणार आहे.

राज्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) हे १७ ऑगस्ट पासून चालू झाले आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस रंगणार आहे. विधानसभाचे पावसाळी अधिवेशन हे १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या होत्या. त्यानंतर दि. २२ ऑगस्टचा तिसरा दिवस आणि दि. २३ ऑगस्टचा चौथ्या दिवशी अधिवेशनात बरंच काही घडले. आणि काल दि. २४ ऑगस्ट रोजी तर अनपेक्षित प्रकार हा सर्व नागरिकांना पाहायला मिळाला. आज शेवटचा दिवस असून अधिवेशनाची सांगता होणार आहे.

हे ही वाचा :-    स्वाइन फ्लू: अचानक फ्लूच्या घटनांमागील कारणे काय आहेत आणि ते कसे टाळता येईल

अधिवेशनाचा पाहिला दिवस हा १७ ऑगस्ट रोजी रंगला. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाचा मुद्दा मांडला. तसेच २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. तर विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून २८९ अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी केली. तसेच हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके ४७ प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत.

दि २२ ऑगस्ट रोजी म्हणजेच विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, तो आमचा अजेंडा नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तर चौथ्या दिवशी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक वेगळंच रुप महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देत असताना विरोधकांना चांगलेच टोले लगावले आहेत. तर विरोधकांकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. तर ओला दुष्काळ का जाहीर केला नाही म्हणून अजित पवारांनी सभात्याग केला.

तर काल म्हणजेच पाचव्या दिवशी तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचे दिसून आले. गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात येते आहे. परंतु आज या उलट झालेलं पाहायला मिळाले. आज सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही गटातील आमदारांमध्ये बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळालं. अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.

तर आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज विधिमंडळात काय घडणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेलं आहे.

हे ही वाचा :-

मुख्यमंत्री शिंदे यांना मिळेनासे झालंय पोटभर जेवण-औषधं

विधिमंडळाच्या बाहेर झालेल्या गोंधळावर आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss