spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढेच १० दिवस अधिवेशनामुळे महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपूरमध्ये वातावरण तापणार आहे. पुढेच १० दिवस नागपूर राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान असणार आहे. या अधिवेशनामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक वाद होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या विषयांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का?या कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.

सुरुवातीला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील.
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश २०२३ (दुसरी सुधारणा) (वित्त विभाग)
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२३ ( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)
महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक २०२३ (गृहनिर्माण विभाग)
सन २०२३-२४ च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. – शासकिय कामकाज
त्यांनंतर शोकप्रस्ताव सादर केला जाईल.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात होणार आहे. आगामी निवडणुका (Lok Sabha Election २०२४) डोळ्यासमोर ठेवून मोठमोठ्या घोषणांची शक्यता आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. या अधिवेशनात शेकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केले जाणार आहेत. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ठाकरे गट आपली ठाम भूमिका मांडणार आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे.

हे ही वाचा:

ठाकरे गटाच्या सुनिल प्रभूंचे आव्हान

ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान एका कामगाराचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss