spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Assembly Winter Session 2023, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापला

आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढेच १० दिवस अधिवेशनामुळे महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपूरमध्ये वातावरण तापणार आहे.

आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढेच १० दिवस अधिवेशनामुळे महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपूरमध्ये वातावरण तापणार आहे. पुढेच १० दिवस नागपूर राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान असणार आहे. या अधिवेशनामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक वाद होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा (NCP Office) वाद तापला आहे.

विधिमंडळ परिसरात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) प्रत्युत्तर असणारे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नावाची लावण्यात आलेली पाटी काही तासातच पुन्हा काढण्यात आली आहे. काल या ठिकाणी अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. आता जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आल्याने, हे कार्यालय अजित पवार गटाला मिळालं का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळत होती.

याबाबत, अजित पवार गटाच्या वतीने माहिती देण्यात आली की, आम्ही विधानसभा अध्यक्षांना आम्हाला कार्यालय मिळावं यासाठी पत्र लिहिलं होतं. त्यामुळे कार्यालय आम्हाला मिळाला आहे. तर, शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं की, मूळ राष्ट्रवादी आम्ही असल्याने आम्ही पत्र लिहिण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कार्यालय हे आमचेच आहे. असे असतानाच आता आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आली असून, अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचीच पाटी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पाहायला मिळत आहे. तर आज नवाब मलिक अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. कामकाजात सहभागी होताना नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार हे अद्याप स्पष्ट नाही. नवाब मलिक यांच्याकडून अद्याप तरी तटस्थ म्हणू भुमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणून दोन्ही नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रीत बसण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यामुळे आमदारांची नेमकी भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Latest Posts

Don't Miss