spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यात थंडी वाढणार, पुढील २४ तासांत पावसाची शक्यता

मागील काही महिन्यांपासून राज्यासह देशातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत.

मागील काही महिन्यांपासून राज्यासह देशातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. डिसेंबर महिना संपायला आला असूनसुद्धा थंडी पडलेली नाही. पण त्या उलट कधी ऊन, कधी पाऊस असे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील २४ तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात थंडी वाढणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यभरात गारठा वाढणार आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार , १३ डिसेंबरपर्यंत राज्यातील काही भागात पावसाची शक्याता वर्तवली आहे. अनेक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील वातावरणात अनेक बदल झाले आहेत. पण पर्वतीय विभागात बर्फवृष्टीमुळे गारवा वाढला आहे. तसेच राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी वाढणार आहे. तसेच काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पारा घसरेल आणि काही ठिकाणी थंडी वाढू शकते. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुण्यासह राज्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील ३ ते ४ दिवस राज्याच्या अंतर्गत भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान रात्रीच्या वेळात थंडी पडणार आहे.

महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम हवामानावर झाला आहे. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ डिसेंबर पर्यंत काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात सतत दाखल होत असलेल्या पश्चिम मान्सूनमुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे सकाळच्या भागात कमी थंडी पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत पूर्व महाराष्ट्रातील अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता नसून थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

Organ Donation, व्यक्तीच्या मृत्यूनंतर शरीरातील ‘हे’ अवयव करू शकता दान…

POLITICS: कृषीमालाला चांगला भाव मिळेल, याचा निर्णय होणे गरजेचे- आमदार अनिल देशमुख

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss