spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपाकडून मध्यप्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये त्यांनी शिक्षण मंत्री जबाबदारी सांभाळली आहे

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठं यश मिळवलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या या निवडणुकीत भाजपाने १६३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपाचे केंद्रीय नेते मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे देणार? याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात होते.

अखेर सोमवारी भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील.

मोहन यादव हे उज्जैन विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. तसेच शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये त्यांनी शिक्षण मंत्री जबाबदारी सांभाळली आहे. तसेच २०११-१२ आणि २०१२-१३ मध्ये मध्य प्रदेशातील पर्यटन विकासासाठी राष्ट्रपतींनी मोहन यादव यांना पुरस्कार दिला होता.

याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाचे सरचिटणीस आणि आमदार कैलास विजयवर्गीय यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं, “पंतप्रधान मोदी हे नव्या भारतासाठी एक नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन विकास म्हणून काम करत आहेत. मध्य प्रदेश मॉडेल म्हणून नेतृत्व करेल. नवीन नेतृत्वाखाली राज्य ते स्वप्ने पूर्ण करेल. ”

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss