spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ख्रिसमससाठी सॅलेड डेकारेशन करण्याचे जाणुन घ्या टीप्स

ख्रिसमससाठी सॅलेड डेकारेशन करण्याचे जाणुन घ्या टीप्स

नाताळा आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे.आता या सणाला मोठमोठ्या पार्टी तर होणारचं मात्र तरीही ख्रिसमस डेकोरेशन हे खुप महत्तवाचे असते.यावेळी अनेक प्रकेरे डेकोरेशन केले जाते.

ख्रिसमसच्या दिवशी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन पार्टी तर होतच असतात.मात्र घरच्या घरी देखील छान डेकोरेशन करुन नातेवाईकांना बोलवून पार्टीचं वेगवेगळ्या पद्धतीत नियोजन केलं जातं.
दरम्यान तुमच्या घरीही ख्रिसमससाठी एखादी छान मोठी पार्टी किंवा नविन वर्षाच्या स्वागताकरिता गेट टुगेदर होतचं असेल ,तर यावेळी डेकोरेशनसाठी एक नविन आयडिया करा.सांता क्लॉस किंवा मग ख्रिसमस थीम घेऊन केलेलं सलाड डेकोरेशन नक्की येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं लक्ष वेधून घेईल. तसेच तुमची पार्टीही या निमित्ताने एकदम हटके हाेऊन जाईल.
सध्या बाजारात गाजर, मुळा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. गाजर, मुळा यांचा वापर करून अशा पद्धतीचा सांताक्लॉज नक्कीच तयार करता येईल. चेहऱ्याच्या जागी पेरूचे काप ठेवले तरी चालेल. शिवाय हे करायला देखील अगदीच सोपं आहे.असा वेगळ्या पद्धतीचा सांता तुम्ही बनवु शकता.
नाताळ म्हटलं की सांताक्लॉज सोबत ख्रिसमस ट्री देखील पाहिजेच.. ख्रिसमस ट्री करण्याची ही बघा एक सोपी ट्रिक. करडी, मेथी, पालक अशा भाज्या ख्रिसमस ट्रीच्या आकारात रचून ठेवा आणि मग त्याला गाजराचे काप, चेरी, डाळिंबाचे दाणे लावून डेकोरेट करा.
परदेशांत या दिवसांमध्येच स्नो मॅन देखील बनवतात. गाजर, मुळा यांचा वापर करून अशा पद्धतीने स्नो मॅन बनवता येतील. तसेच हिरव्या काकडीचा वापर करून असे छोटे छोटे ख्रिसमस ट्री देखील करता येतील.
चीज- चेरी- पायनॅपल हे अनेकांचं आवडीचं सलाड असतं. या ३ पदार्थांचा वापर करूनही त्यापासून असा सांताक्लॉज बनवू शकता.
काकडीचे छोटे छोटे काप करून ते टुथपिकने एकमेकांना आणि एखाद्या मोठ्या काकडीला किंवा मुळ्याला जोडायचे. असं छान ख्रिसमस ट्री तयार होईल.

 

Latest Posts

Don't Miss