spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गोपीनाथ मुंडेंचा राजकारणातील धगधगता प्रवास

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) म्हटलं तर समोर येतो तो करारी आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण करणारं जबरदस्त व्यक्तिमत्त. गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) म्हटलं तर समोर येतो तो करारी आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण करणारं जबरदस्त व्यक्तिमत्त. गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज महाराष्ट्रात भारतीय जनतेचा जो वटवृक्ष वाढलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे गोपीनाथ मुंडेंना जातंय. राज्यातल्या वंचित आणि रंजल्या गांजल्या समाजासाठी ज्या काही लोकांनी आपलं आयुष्य वेचलं त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं नाव अग्रक्रमावर येतं. त्याच गोपीनाथ मुंडेंची आज जयंती.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून कार्याला सुरूवात
गोपीनाथ मुंडेंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. इंदिरा गांधींनी भारतात लावलेल्या आणिबाणी विरोधात त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी अटक करुन त्यांना नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.

पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार
युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी झपाटून कामाला सुरूवात केली. त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातलं गाव अन् गाव पिंजून काढलं. त्याचा फायदा गोपीनाथ मुंडेंना झाला आणि त्यांचा जनसंपर्क वाढला. गोपीनाथ मुंडेंनी१९८०– १९८५ आणि १९९०-२००९ या काळात पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. १९९२-१९९५ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं.

महाराष्ट्रातील युतीच्या सरकारचे शिल्पकार
काँग्रेसचा पराभव करायचा असेल तर राज्यात समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र यावं लागेल हे गोपीनाथ मुंडेंनी ओळखलं होतं. त्यामुळेच त्यांनी आणि प्रमोद महाजनांनी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंना युतीसाठी तयार केलं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे -१९९५ साली काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसचा पराभव करून-१९९५ साली राज्यात युतीचं सरकार सत्तेत आलं. त्या सरकारचे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोन नेते शिल्पकार ठरले. युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले.

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss