spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आयकर विभागाच वराड कोल्हापूरकड, अर्जुनवाड्यासह साखर कारखान्याची चौकशी सुरु

संपूर्ण राज्यभरात आयकर विभागाकडून ठिकठिकाणी छापेमारी सुरु आहे. काल म्हणजेच गुरुवारी दिवसभरात आयकर विभागाने राज्यात एकूण २४ ठिकाणी छापे मारले आहे. त्यानंतर आज आयकर विभागाचे पथक हे कोल्हापुरात दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आयकर विभागानं अर्जुनवाडमध्ये छापा टाकणार आहे. साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कडून कसून चौकशी केली जात आहे. सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदारांच्या निवासस्थानावर हा छापा टाकण्यात आला आहे.

////////////

शुभ प्रसंही आनंदावर विरजण, लग्नघरात आगीच्या भडक्यात ५ जणांनाचा मृत्यू

आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु केली होती. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेले अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथक दाखल झाली होती. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी जालन्यात स्टील व्यावसायिकांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. या कारवाईसाठी जाताना आयकर विभागाचे अधिकारी जणू लग्नाच्या वरातीप्रमाणे गेले होते. वाहनांवर लग्नाचे स्टिकर लावून अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. काल महाराष्ट्रातील विविध भागात सुरु असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबिराचे पोस्टर लावण्यात आले होते.

हेही वाचा : 

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार आता सुखकर

Latest Posts

Don't Miss