spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्याची आरोग्य यंत्रणा सलाईनवर, परिचारिकांचा संप

राज्यातील परिचारिकांनी आजपासून बेमुदत संपला सुरुवात झाली आहे.

राज्यातील परिचारिकांनी आजपासून बेमुदत संपला सुरुवात झाली आहे. निवृत्तिवेतन आणि निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणीसाठी हा संप सुरु केला आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील एक हजार परिचारिकांचा सहभाग आहे. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपाचा परिणाम राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर झाला आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. घाटी रुग्णालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरु आहे.

राज्यातील परिचारिकांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था सुरु केली आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व वर्ग चारचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहेत. यामुळे नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना बोलावण्यात आले आहे. अनेक शासकीय रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांवर काम सुरु करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे परिचारिक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत केली जात आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे बैठक पार पडली. काही बैठकीमधून काहीच सध्या न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी आहेत.

राज्य सरकारने मागील सहा महिन्यांपासून कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आम्ही राज्य सरकारला बराच अवधी दिला. त्यानंतरही आमची मागणी मान्य झाली नाही. यामुळे आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात मुंबईतील जे.जे. रुग्णालय येथे आंदोलन करण्यात आले. आज सर्व हॉस्पिटलमधील कर्मचारी संपावर गेल्यामुळे रुग्णांसेवेवर परिणाम झाला आहे. आता जोपर्यंत आमच्या मागण्या लिखित स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा बेमुदत संप सुरु राहील असे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

राजकीय वातावरण तापण्याची शक्यता , राजेश टोपे-बबनराव लोणीकरांचा ऑडिओ व्हायरल

MAHARASHTRA: प्रदीर्घ लढ्याला यश! स्वाधारच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss