spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra: कालचा मोर्चा ‘मातोश्री बचाव मोर्चा’ होता, NITESH RANE यांची ठाकरे गटावर टीका

उद्धव ठाकरेंची मुंबईत ताकद नाही, कालचा मोर्चा 'मातोश्री बचाव मोर्चा' होता अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र उगारले आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा अदानी उद्योग समूहाविरोधात जोरदार मोर्चा १६ डिसेंबरला काढण्यात आला होता.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या मोर्च्याच्या अनुषंगाने धारावीत बॅनरबाजी करण्यात आली होती. यावेळी धारावी ते बीकेसी (BKC) पर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ४५ ते ५ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र गृह रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आदी ३०० च्यावर पोलिसांचा या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड (VARSHA GAIKWAD), सदा परब (SADA PARAB), आमदार आदित्य ठाकरे (AADITYA THACKERAY), पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY), खासदार संजय राऊत (SANJAY RAUT) तसेच ठाकरे गटाचे इतर कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या मोर्च्याला घेऊन आता राजकीत वातावरणात चांगलीच चर्चा रंगून आल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या विरोधात असलेले अनेकजण आता मोर्च्यावर तसेच उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसाठी घेतलेल्या बाजूवर आता विरोधक टीका करतांना दिसून येत आहेत.

राऊत खिचडीचे पैसे खातो आणि बेरोजगारीवर बोलतो

या मोर्च्याला समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी तसेच कॉंग्रेस नेत्यांनी पाठींबा दिल्याने, मोर्चा काढण्यासाठी यांना काँग्रेस आणि समाजवादीचा पाठिंबा घ्यावा लागतो असे म्हणत नितेश राणे (NITESH RANE) यांनी हल्लाबोल केला आहे. यासोबतच,  उद्धव ठाकरेंची मुंबईत ताकद नाही, कालचा मोर्चा ‘मातोश्री बचाव मोर्चा’ होता अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र उगारले आहे. राऊत खिचडीचे पैसे खातो आणि बेरोजगारीवर बोलतो असे म्हणून सुषमा अंधारे नाही त्यांचं आडनाव फर्निचरवाल्या.. सुषमा फर्निचरवाल्या नितेश राणे यांनी सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या घणाघाती आरोप केले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss