spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MUMBAI: मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी- CM EKNATH SHINDE

मुंबई महानगरपालिकेच्या (MUMBAI BMC) वतीने घाटकोपर पश्चिम येथील अमृत नगर येथून प्रारंभ करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी सहभागी होऊन रस्ते स्वच्छ केले. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यानंतर या भागातील सर्व रस्त्यांची, अंतर्गत मार्गांची, नाले, गटारे सर्वांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर यात सहभागी झालेल्या स्वच्छता कामगारांना सन्मानित करण्यात आले. यासमयी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, आमदार राम कदम, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, माजी नगरसेवक किरण लांडगे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कामगार उपस्थित होते.

मुंबई शहरातील (MUMBAI CITY) वाढत्या प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ वापरून संपूर्ण रस्ते डीप क्लिन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवणार असून त्यात लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केले. मुंबई (MUMBAI) स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे शहर सुंदर दिसल्यास ते खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावाजले जाईल. मुंबई स्वच्छ करणारे हिरो हे स्वच्छता कामगार असून त्यांच्या वसाहती देखील दुरुस्त करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले.

संपूर्ण स्वच्छता अभियाना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) चेंबूर येथील टिळकनगर मैदानात आले असता, स्थानिक तरुणांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रिकेट खेळण्याचा आंनद लुटला.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss