spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विषप्रयोगानंतर निर्माण झालेल्या गंभीर आरोग्याच्या समस्येमुळे त्याला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही असं समजत आहे. अशी माहिती मिळाली आहे कि मागील दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिमवर संबंधित रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संबंधित मजल्यावर तो एकमेव रुग्ण आहे.

फक्त उच्च वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाच तिथे प्रवेश देण्यात येत आहे. या काळात पाकिस्तानातील इंटरनेट सेवाही बंद होती. समाज माध्यमांद्वारे कोणतेही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी सेवा बंद करण्यात आल्याचे बोललं जातं आहे. मुंबई पोलीस अथवा गुन्हे शाखेने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तसेच पाकिस्तानी माध्यमांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी प्रसिद्ध केलेली नाही. पण पाकिस्तानी समाज माध्यमांवर याबाबत जोरदार चर्चा असल्याचं दिसत आहे.

अंडरवर्ल्ड डॉनला रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्तानंतर मुंबई पोलीस दाऊदचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने जानेवारीमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला सांगितलं होतं की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दुसऱ्यांदा लग्न केल्यापासून तो कराचीमध्येच राहत आहे.

दाऊद इब्राहिमचे खरं नाव इब्राहिम कासकर आहे. सध्याचं नाव हाजी सलीम अलियास हाजी अली असे आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेट दहशतवादी, मुंबईचा गुन्हेगार आणि पाकिस्तानाचा नवा ड्रग्ज लॉर्ड दाऊद पाकिस्तानातच आहे. याचे अनेक पुरावे स्थानिक माध्यमांमध्ये आले आहेत. आधुनिक दहशतवादामध्ये बॉम्ब हल्ले, सीमेवर घुसखोरीसह सायबर क्राईम आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हाजी सलीम याच नावाखाली पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी झाली आहे.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss