spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

७ ऑक्टोबरपासून सर्वत्र गुंजणार प्रो कबड्डीचा आवाज

संपूर्ण भारत देशात कमी कालावधीत लोकप्रिय झालेला खेळ म्हणजे कबड्डी. आणि ७ ऑक्टोबरपासून कबड्डी प्रो लीगच्या (Kabaddi Pro League)  नवव्या हंगामाला सुरुवात होत आहे. हा कबड्डी प्रो लीगचा नववा हंगाम आहे.

संपूर्ण भारत देशात कमी कालावधीत लोकप्रिय झालेला खेळ म्हणजे कबड्डी. आणि ७ ऑक्टोबरपासून कबड्डी प्रो लीगच्या (Kabaddi Pro League)  नवव्या हंगामाला सुरुवात होत आहे. हा कबड्डी प्रो लीगचा नववा हंगाम आहे. आणि हा संपूर्ण हंगाम डिसेंबर महिन्यापर्यंत रंगणार असून प्रेक्षकांना हे सामने प्रत्यक्ष जाऊन पाहता येणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती. प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात दंबग दिल्ली केसीनं बाजी मारली. या हंगामातील अंतिम सामन्यात दिल्लीच्या संघानं तीन वेळा विजेता ठरलेल्या पटना पायरेट्सचा एक गुणानं पराभव केला. या हंगामात दिल्लीनं पटनावर ३७-३६ विजय मिळवला होता. फक्त एका अंकानं दिल्लीनं प्रो कबड्डीचा खिताब जिंकला होता. या विजयासह प्रो कबड्डीचा खिताब जिंकणारा दिल्ली सहावा संघ ठरला.

परंतु, आता नवव्या हंगामात प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानात जाऊन प्रो कबड्डी लीगचे सामने पाहता येणार आहेत. कोरोना विषाणू नियंत्रणात आल्यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्सनं याबाबात घोषणा केलीय. या हंगामातील सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया ५,६ ऑगस्ट २००० ला पार पडली होती.

प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात एकूण १२ संघ स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. तसेच हे सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद खेळवले जाणार आहेत. प्रो कबड्डीचा नववा हंगामाचं स्टारस्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. डिस्ने+हॉटस्टार वर लाइव्ह स्ट्रीमिंग केली जाईल.

हे ही वाचा :-

‘पोटात एक आणि ओठात एक…’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या गणेशचतुर्थीत भेट द्या मुंबईतील या 5 प्रसिद्ध गणेश मूर्तींना

मोठी बातमी! अनिल देशमुख यांची आर्थर रोड जेलमध्ये प्रकृती खालावली

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss