spot_img
Saturday, September 7, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MAHARASHTRA: TANAJI SAWANT यांचे ३२०० कोटींचे टेंडर अखेर रद्द

राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय राज्यातील बेरोजगार तरुणांचा रोष टाळण्यासाठी घेतला. मंत्री डॉ. तानाजी सावंत (DR. TANAJI SAWANT) यांच्या आरोग्य खात्यात हजारो कोटींच्या सेवा कंत्राटदारांमार्फत घेण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. यापैकी राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी काढण्यात आले टेंडर रद्द करण्यात आले आहे. वर्षाचे ६३८ कोटींचे हे टेंडर ५ वर्षांसाठी ३,२०० कोटी रुपये ठेकेदाराला दिले जाणार होते. टेंडरमध्ये अनेक गैरप्रकार होते. हे टेंडर कोणालातरी फायदा देण्यासाठी काढण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात होती. या आधी जिल्हा निहाय विकेंद्रीत असलेल्या टेंडरचे एकत्रीकरण करून नवे टेंडर काढण्यात आले होते आणि पुन्हा कंत्राटदाराला उपकंत्राटदार नेमण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली होती.

कंत्राटदाराला (CONTRACTOR) पाच वर्षानंतर सुद्धा मंजुरीच्या आधारावर मुदतवाढ दिली जाणार आहे असा कोण हा कंत्राटदार आहे. ज्याला भविष्यातील कामाचे खात्री दिली जात आहे?  रुग्णालयाचे क्षेत्रफळानुसार किमान निश्चित मनुष्यबळ किती असणे गरजेचे आहे. तसेच यासाठी किती पुरुषाने किती महिला असल्या पाहिजेत याचा उल्लेख टेंडर मध्ये करण्यात आला नव्हता. प्रत्येक रुग्णालयात किती यंत्रसामग्री आणि किती उपकरणे असायला हवी, त्याचाही उल्लेख टेंडर (TENDER) मध्ये केला नव्हता. स्वयंरोजगार संस्था आणि बेरोजगारांना वाव दिलेला नाही. तसेच असे जर केले तर स्थानिक पातळीवर अनेकांना रोजगार मिळू शकेल, आता अचानक पाच वर्षांसाठी असलेले कॉन्ट्रॅक्ट २०२३ आणि २४ या वर्षासाठी करण्याचा शासन शासनातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. टेंडरच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात गाजावाजा झाल्यामुळे १८ डिसेंबर २०२३ रोजी हे टेंडर रद्द करण्यात आले आहे.

 

हे ही वाचा:

आयपीएल २०२४ साठी दुबईमध्ये लिलाव सुरु

IPL Auction 2024, शार्दुल ठाकूर खेळणार चेन्नई सुपर किंग्जकडून…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss