spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

POLITICS: मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंतप्रधान मोदीजींनी २०३० पर्यंत हिरे उद्योग ७५ बिलियन डॉलर्स इतका मोठा व्हावा, अशी अपेक्षा केली आहे. याचा मोठा फायदा मुंबईलाच होणार आहे. मुंबई ही मुंबई आहे. मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका !!!

२० डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी अनेक विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप करत उत्तरे आणि आश्वासने दिली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग, व्यापाराबद्दल मत व्यक्त करत व्यवसाय क्षेत्रात मुंबई कशाप्रकारे अग्रेसर आहे, याची माहिती दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

सुरत डायमंड बुर्सचे उदघाटन झाले, हे खरे आहे. पण, सुरत डायमंड बुर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बुर्स या दोन्हीच्या कार्यपद्धतीत फरक. सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब, तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट हब. या मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही.

भारतातील ३८ बिलियन डॉलर्स इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईतून होते. ती एकूण निर्यातीच्या ७५ टक्के

सुरतचा निर्यातीतील वाटा : १२ टक्के

जयपूरचा वाटा : ३.१२ टक्के

पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी मुंबईतून ९७ टक्के आता तुम्ही कोरोना काळात सारेच बंद करुन टाकले, त्यामुळे काय झाले तेही पहा.

२०२०-२१ : मुंबई : ९४.२५ टक्के, सुरत :५.५७ टक्के.

आता २०२३-२४ : नोव्हेंबर २३ पर्यंत मुंबई : ९७.१३ टक्के, सुरत : २.५७  टक्के

स्टडेड गोल्ड ज्वेलरी निर्यात मुंबई : ६६.५१  टक्के, सुरत: ९.९६ टक्के

प्लेन गोल्ड ज्वेलरी निर्यात मुंबई : २७.३२ टक्के, सुरत :८ .७९ टक्के

आता मुंबईचा जेम्स अँड ज्वेलरी पार्क इटली आणि तुर्कीच्या धर्तीवर होणारमध्यंतरी युएई आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला. त्यात मुंबईला उत्पादन केंद्र म्हणून भक्कम करणार. ⁠महापेत २० एकर जागा दिली आणि आशियातील सर्वांत मोठा ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’ तेथे उभा राहतोय. या पार्कसाठी ५  एफएसआय वीजदरात सवलतजीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय मलबार गोल्डची ऑक्टोबरमध्ये १७०० कोटींची गुंतवणूक तनिष्क सुद्धा डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करते आहे आणि तुर्की डायमंड बुर्स सुद्धा मुंबईत येतो आहे. पंतप्रधान मोदीजींनी २०३० पर्यंत हिरे उद्योग ७५ बिलियन डॉलर्स इतका मोठा व्हावा, अशी अपेक्षा केली आहे. याचा मोठा फायदा मुंबईलाच होणार आहे. मुंबई ही मुंबई आहे. मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका !!!

हे ही वाचा:

मिमिक्री ही एक कला…, कल्याण बॅनर्जी यांचे राज्यसभेचे सभापती धनखर प्रकरणावर स्पष्टीकरण

MI Playing 11 : लिलावात ८ खेळाडू खरेदी, तर IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्लेईंग इलेव्हन घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss