spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून विशेष कार्यक्रमांचे आयोजन

अयोध्यातील राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची संपूर्ण देशवासीयांना उत्सुकता लागली आहे.

अयोध्यातील राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची संपूर्ण देशवासीयांना उत्सुकता लागली आहे. लवकरच राम मंदिराचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. २२ जानेवारी २०२४ ला हा सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात हा सोहळा उत्साहासारखा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी भाजपकडून विशेष तयारी करण्यात येणार आहे. राज्यभरात हा सोहळा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या प्रदेश कार्यालयात सात दिवस विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान हा सोहळा होणार आहे.

रामलललाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यासाठी अवघा देश उत्सुक आहे. भाजप प्रदेश कार्यालयात होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच उद्धाटन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर रामाची मोठी फ्रेम, राम मंदिराची प्रतिकृती आणि रोषणाई करण्यात येणार आहे. अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलिया, रामायण मालिकेत रामाची भुमीका साकारणारे अरुण गोविल यांना बोलवण्यात आले आहे.

रामलललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा कसा असणार

१५ जानेवारी:- उद्घाटन
१६ जानेवारी:- सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
१७ जानेवारी:- अलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांची भजनाची संध्या
१८ जानेवारी:- अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीत
२० जानेवारी:- रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती
२१ जानेवारी:-कवी मनोज शुक्ला यांचा कार्यक्रम
२२ जानेवारी:- पद्मश्री सुरेश वाडकर यांचे कार्यक्रम

अश्या प्रकारे संपूर्ण कार्यक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लातूरच्या शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदावरून गावकऱ्यांमध्ये राडा

प्रभासच्या सालार चित्रपटाने पहिल्यांच दिवशी केली दमदार ओपनिंग,शाहरुखच्या डंकीला टाकलं मागे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss