spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारीला आझाद मैदानात मनोज जरांगेंच आमरण उपोषण

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात वातावरण तापण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षणाच्या मागणीसाठी सभा घेतल्या आहेत. मराठा बांधवाना आरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जरांगे सभा घेत आहेत. मनोज जरांगे यांची आज बीडमधील पाटील मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. तुम्ही नोटीस देऊन ट्रॅक्टर जप्त करू शकाल पण मराठा समाजाला कसं दाबू शकाल असा प्रश्न मनोज जरांगे यांनी सभेत विचारला. त्यानंतर त्यांनी या सभेत एक मोठी घोषणा केली आहे. आंतरवली सराटी गावातील मराठा आरक्षणाचं वादळ २० जानेवारीला मुंबईमधील आझाद मैदानावर येऊन धडकणार आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून सर्व मराठा बांधवानी यावे, असे आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. आता देव आडवा आला तरी मराठा आरक्षण ओबीसी मधून घेणार, सरकार मराठा समाजाला कस आरक्षण देत नाही ते पाहू, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी लढणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी १८ जानेवारी पर्यंतच्या नोटीस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठा समाजाला दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं.आता मुंबईत २० जानेवारीपासून रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईमध्ये यायचं आहे. मराठा आंदोलनात कोणीही जाळपोळ करू नये, जो जाळपोळ करेल तो आपला नाही असे मनोज जरांगे म्हणले. जे आमदार किंवा खासदार मराठा आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत त्यांना दारात देखील उभे करू नका,असे आव्हान जरांगे यांनी केले आहे. मराठ्यांच्या जीवावर हे सगळे आमदार खासदार झाले, पण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कितीजण पुढे आले. आता यापुढे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे आमदार साथ देणार नाहीत त्यांना दारातही उभे करू नका. जो मराठा आरक्षणसाठी लढेल तो आपला, असे जरांगे म्हणाले.

सरकारने पुन्हा एकदा नवीन डाव रचला आहे. मराठा आंदोलकांना नोटीस देण्यात आल्या. ट्रकटर घेऊन सभेला गेलात तर तो जप्त करण्यात येईल. महाराष्ट्रातील मराठ्यांनी आंदोलन करायचे पण शांततेमध्ये ते ब्रह्मात्र आहे. शांतपणे आंदोलन केल्यास ते कुणीही थांबवू शकत नाही. मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मी मिळवून देणार. या आधीच्या पिढ्यांचे आयुष्य आरक्षणाशिवाय उध्वस्त झाले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

बिग बॉसच्या घरात विकी जैनने अंकिता लोखंडेवर उचलला हात,व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी करतायत ट्रोल    

येत्या नवीन वर्षात तूम्ही SIP मध्ये गुंवणूक करण्याचा करताय तर हे नक्की वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss