बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत चर्चेत आहे.मलायकासोबतच्या घटस्फोटानंतर तब्बल सहा वर्षानीअरबाज खान याने वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.दरम्यान अर्पिता खानच्या घरी अरबाजचा लग्नसोहळा पार पडला आहे. गर्लफ्रेंड शुरा खानसोबत त्याने दुसरं लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्यात कुटुंबिय आणि काही जवळचे लोक सहभागी झाले होते.अरबाज आणि शुरा यांच्या लग्नसोहळ्याला सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अरबाज आणि शुरा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अर्पिताच्या घरी अरबाज आणि शुरा यांचा निकाह झाला आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होता.
अरबाज खानच्या लग्नसोहळ्याला बॉलीवूडमधील सेलिब्रिटीची मांदियाळी पाहायला मिळाली. रिद्धिमा पंडित, सोहेल खान तिचा मुलगा निर्वाण, सलमान खान, यूलिया वंतूर, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, सलीम खान, सलमा, अरबाज खान, अरहान खान, सोहेल खान, रवीना टंडन, अनिल थडानी, वरुण शर्मा, काँग्रेस नेते बाबा सिद्धीकी, फरहा खान, साजिद खान, राजकुमार संतोषी, अलिजेह अग्निहोत्री, संजय कपूर, महीप कपूर, यास्मिन कराची वाला, वालुशा डिसूजा, साजिद खान, साजिद नाडियादवाला या सेलिब्रिटींनी अरबाज-शुराच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
शुरा खानआधी अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. काही दिवसांपूर्वीच जॉर्जियासोबत त्याचा ब्रेकअप झाला आहे. त्यानंतर त्याने शुराला डेट करायला सुरुवात केली. अरबाज आणि मलायका यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. शूरा ही मेकअप आर्टिस्ट असून हेअर स्टायलिस्टदेखील आहे.दरम्यान असं बोलं जातं की शूरा ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते.
अरबाज खानने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अरबाज आणि शुरा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”आपल्या प्रियजनांच्या उपस्थितीत मी आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे”.दरम्ययान शूरा ही मेकअप आर्टिस्ट असल्याने त्यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्येही काम केले आहे. या दोघांची पहिली भेट आगामी चित्रपट पटना शुक्लाच्या सेटवर झाली,आणि पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं
हे ही वाचा:
शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ
आरक्षणाचा खरा फायदा कुणाला? समाजाला की दोन्हीकडच्या नेत्यांना? |MANOJ JARANGE PATIL| CHHAGAN BHUJBAL
Follow Us