spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

winter season ;  जाणुन घ्या बाजरीपासून बनवले जाणारे ‘हे’ पदार्थ,हिवाळ्यात शरीरासाठी फायदेशीर

थंडीच्या दिवसात आपण आपल्या जीभेचे चोचले बऱ्याचं वेगवेगळ्या पद्धतीने पुरवत असतो.आरोग्यासाठी जे उत्तम आणि फलदायक असेल तेचं खाणं आपण रोजच्या वापरात खात असतो.

थंडीच्या दिवसात आपण आपल्या जीभेचे चोचले बऱ्याचं वेगवेगळ्या पद्धतीने पुरवत असतो.आरोग्यासाठी जे उत्तम आणि फलदायक असेल तेचं खाणं आपण रोजच्या वापरात खात असतो.तर आता थंडी असल्यामुळे या दिवसात आपण बाजरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.खरतर बाजरी हिवाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते, कारण बाजरी हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते. यापासून बनवलेले पदार्थ चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात.बाजरीत मॅग्नेशियम, फायबर, लोह, कॅल्शियम आणि नायट्रोजन मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील बाजरी खूप उपयुक्त आहे.रक्तातील साखर सामान्य करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.आणि बाजरी खाल्याने बौद्धिकपातळीत ही भर पडली जाते.चला तर मग जाणुन घेऊयात बाजरीपासून बनवले जाणारे पदार्थ…

बाजरीचे लाडू

हिवाळ्यात बाजरीचे लाडू बनवनं खुप सोप आहे.आणि तुम्ही ते बनवू देखील शकता.तुम्ही ते ड्रायफ्रुट्समध्ये देखील मिसळू शकता. भाजलेल्या बाजरीत ड्रायफ्रूट्स, देशी तूप आणि साखर मिसळून लाडू बनवता येतात.

बाजरीची भाकरी

भाकरी ही प्रत्येकांच्या घराघरात बनवली जाते.तर बाजरीची भाकरी ही लसूण आणि हिरव्या मिरचीच्या चटणीबरोबर किंवा देशी तूप आणि गूळ मिसळून खाल्ली जाते.

बाजरी आणि मेथी कचोरी

बाजरीच्या पिठात थोडं मीठ, ओवा आणि मेथी घालून ते व्यवस्थित मिक्स करा, नंतर बारीक करा, आता मळलेल्या पिठात मिक्स करा, नंतर गरमागरम कचोऱ्या तयार करा, ज्या तुम्ही आलू गोबी किंवा दम आलू सोबत खाऊ शकता.

बाजरीची खिचडी

राजस्थानची डिश म्हणजे बाजरीचा खिचडी जे देशी तुपासोबत खाल्ले जाते. हे करण्यासाठी बाजरी रात्रभर भिजत ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यापासून खिचडी तयार करा.ही खिचडी बनवण्यासाठी मूग डाळ, कांदा, लसूण, गाजर, बीटरूट, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर इत्यादी हिरव्या भाज्या वापरा. हे चव आणि आरोग्याने परिपूर्ण आहेत.

हे ही वाचा:

LIFESTYLE: MAKEUP करायच्या ‘या’ टिप्स तुम्हाला माहिती आहेत का?

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित,कोणत्या कलाकाराकडे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

 

Latest Posts

Don't Miss