spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पराभवानंतर उभारी घेण्याची वृत्ती खेळ शिकवतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहापटीने वाढ करण्याची घोषणासुद्धा  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे आयोजित ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४  चे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी केले. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री संजय बनसोडे, रामदास आंबटकर, भारतीय दिग्गज खेळाडू हिमा दास, ललिता बाबर, मालविका बनसोड व अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे (CHANDRAPUR DISTRICT) गॅझेटिअर व ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मिशन ‘ऑलिम्पिक २०३६ या लोगो’चे अनावरण देखील केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये खेळाडूवृत्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही खेळ हा केवळ जिंकण्यासाठी अथवा हारण्यासाठी खेळला जात नाही तर, पराभवानंतर खचू नये व जिंकल्यानंतर अतिउत्साह दाखवू नये ही गोष्ट आपल्याला खेळ शिकवते. खेळताना जय-पराजयाचा विचार न करता आपल्या देशाचा व राज्याचा विचार केल्यास सर्व खेळाडूंचा खेळ उंचावेल. चंद्रपूर ही वाघ व साग या दोघांची नगरी आहे. कोणत्याही ऋतूमध्ये या दोघांना काहीही फरक पडत नाही. वाघ व साग हे आपापल्या क्षेत्रातील राजे आहेत. त्यामुळे चंद्रपूर येथे स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत आहे. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंच्या सेवेसाठी महाराष्ट्र सरकार तत्पर आहे. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM NARENDRA MODI) यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा ११ सूत्री कार्यक्रम शासनाने जाहीर केला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनानेही खेळाला प्राधान्य दिले असून याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बल्लारपूर येथील ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहापटीने वाढ करण्याची घोषणासुद्धा  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Latest Posts

Don't Miss