spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

थर्टी फर्स्टला मद्य पार्टी करणाऱ्यांसाठी एक दिवसांचा दारू परवाना असणे आवश्यक

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. स्वागतासाठी अनेकवेळ चालणाऱ्या पार्ट्यांना आणि दारूच्या दुकानांना मध्यरात्रीपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. थर्टी फास्टच्या उत्सहात विरजण पडू नये म्हणून दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत ही दुकाने चालू असणार आहेत. बीड जिह्ल्यात ३१ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेपर्यंत दारूची दुकाने चालू असणार आहेत. देशी, विदेशी मद्य विक्री व बिअर विक्री सुरु ठेवण्यात येणार आहे. पण दारू पिणाऱ्या नागरिकांना एका दिवसाचा तात्पुरता परवाना काढणे आवश्यक असणार आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून मध्य विक्रीची दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहेत. तर महानगरांमध्ये पाच वाजेपर्यंत ही दुकान चालू ठेवण्यात येणार आहेत. बीड जिह्ल्यात दारू पिण्यासाठी एक दिवसाचा परवाना काढणे बंधनकारक असणार आहे तरीही बीड जिल्ह्यात एकानेसुद्धा परवाना काढण्यासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे कारवाई करताना कोणीही विनापरवाना दारू पिताना आढळ्यास नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कारवाई करण्यात येणार आहे. मद्य प्रशासनासाठी परवाना वाइन शॉप, बिअर शॉप, परमिट रूम यांनाही मिळू शकतो. पाच रुपये शुल्क भरून तुम्ही हा परवाना मिळवू शकता. एक वर्षाच्या परवान्यासाठी १०० रुपये तर अजीवन परवान्यासाठी १ ते दीड हजार रुपये भरावे लागणार आहेत. पण परवाना घेऊन मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या कमी आहे. बीड जिह्ल्यात दारू पिऊन अपघात होऊ नये म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच तपासणी देखील केली जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्याला तपासणीसाठी मशीन देण्यात आल्या आहेत. यामध्ये ४० मशीन देण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुदीराज यांनी सांगितले आहे.

३१ डिसेंबरला अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाच्या पथकाचे लक्ष असणार आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात उत्पादन शुल्क विभागाने ६१६ गुन्हे नोंदवले आहेत. ५९६ आरोपीना अटकी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १ कोटी २४ लाख ३४ हजार ६३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

मास्टरलिस्टची लॅाटरी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर, नव्या मनमानीने भाडेकरू प्रचंड धास्तीत

सैफ आणि अमृतासाठी हा निर्णय घेणे खूप कठीण होते – शर्मिला टागोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss