spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अवघ्या काही सेकंदातच ट्विन टॉवर झाले जमीनदोस्त, ३२ मजली टॉवरचा उरला फक्त ढिगारा

देशातील सर्वात उंच इमारत अखेर आज जमीनदोस्त करण्यात आली आहे. नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अखेर जमीनदोस्त झाले आहेत. याची

देशातील सर्वात उंच इमारत अखेर आज जमीनदोस्त करण्यात आली आहे. नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अखेर जमीनदोस्त झाले आहेत. याची बरेच दिवसांपासून चर्चा होती. आता शेवटी ट्विन टॉवर काही सेकंदातच पाडण्यात आला आहे. काही सेकंदामध्ये हे बहुमजली टॉवर्स कोसळले. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरल्याचे दिसून आले.

टॉवर पाडण्याची तारीख २२ मे २०२२ निश्चित करण्यात आली होती, परंतु तयारी पूर्ण झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना वेळ दिला. यानंतर २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान टॉवर तोडण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, यावेळीही टॉवर पाडण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र संबंधित यंत्रणेने प्राधिकरणाला पत्र देऊन ट्विन टॉवर कमकुवत झाल्यामुळे धोक्याची भीती व्यक्त करत २८ तारखेपर्यंत तो पाडण्याची सूचना केली होती.

आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर्स (Twin Tower) पाडण्यासाठी ४६ जणांची टीम तयार करण्यात आली. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त झाले. हे बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार झाला. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळच धूळ पसरली. खरेदीदारांच्या तक्रारीनंतर कोर्टानं ट्विन टॉवर म्हणजे एपेक्स (३२ मजली) आणि सियान टॉवर्स (२९ मजली) पाडण्याचे आदेश दिले आहेत.

स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या काही सेकंदातच एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत आहे. बांधकाम पाडण्यासाठी ३५०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. जवळपासचे निवासी भाग रिकामे करण्यात आले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा कर्मचारी, बचाव पथक, अग्निपथक तैनात करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त

नोएडा ट्विन टॉवर्सची कथा’: सुपरटेक इमारती कशामुळे पाडल्या जाणार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss