spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जाणुन घ्या.. मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या बेसिक टिप्स

एकदम साधा सोप्या म्हणेजच बेसिक मेकअप हा एखाद्या पार्टीसाठी किंवा रेग्युलर ऑफिससाठी वापरला जातो. मेकअप करताना आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे.

एकदम साधा सोप्या म्हणेजच बेसिक मेकअप हा एखाद्या पार्टीसाठी किंवा रेग्युलर ऑफिससाठी वापरला जातो. मेकअप करताना आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून चेहेऱ्यावर मेकअपच्या साहित्याचा कोणताही इफेक्ट होणार नाही. मेकअप करताना सर्वात महत्वाची पायरी म्हणजे मेकअपचे साहित्य घेताना त्यांचीअंतिम तारीख बगुन घ्यावी. आपल्याकडे मेकअपचे सर्व साहित्य उपलब्ध असेल तर आपल्याला छान आणि पटकन मेकअप करता येतो. आपण आपला स्वतःच मेकअप केला की आपण कोण्यातही कार्यक्रमासाठी पटकन तयार होतो,आणि आपला वेळ ही वाचतो.

तर मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या बेसिक टिप्स जाणून घेऊया.

  • प्रायमर – बहुतेकवेळा सर्वजण प्रायमरकडे दुर्लक्ष करतात,पण प्रायमर हा मेकअप मधला एक महत्वाचा भाग आहे. प्रायमर मेकअप दीर्घकाळ टिकवून ठेवतो, बेस बरोबरच चेहऱ्याला एक गुळगुळीत लूक देतो.अनेकदा आपण प्रायमरच्या निवडीमध्ये चुका करतो. आजकाल बाजारात बर्‍याच प्रकारचे प्रायमर विकले जातात. परंतु, माहितीअभावी बर्‍याच वेळा आपल्याला चुकीचा प्रायमर मिळतो, ज्यामुळे चेहऱ्याला काही फायदा होत नाही. प्रायमरची निवड त्वचेनुसार करावी. समजा आपली त्वचा कोरडी असेल, तर मॉइश्चरायझरयुक्त प्रायमर निवडले पाहिजे. प्रायमर लावण्यापूर्वी आपण प्रथम तोंड धुवावे आणि नंतर त्यावर मॉइश्चरायझर लावावे, ते आपल्या त्वचेत नीट शोषले जाईपर्यंत थांबावे. त्यानंतरच प्रायमर लावावे. जर आपली त्वचा तेलकट असेल, तर मॅट प्रायमर वापरावा आणि जर आपली त्वचा कोरडी असेल तर जेल-बेस्ड प्राइमर आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.

  • फाउंडेशन – प्रायमर आपल्या चेहऱ्यावर मेकअपसाठी बेस तयार करतो, याच्या थराला त्वचेवर सेट होण्यास थोडा वेळ लागतो. म्हणून प्रायमर लावल्यानंतर काही काळ चेहऱ्यावर काहीही लावू नका. परंतु, बहुतेक स्त्रिया अशी चूक करतात की, त्या प्रायमरनंतर ताबडतोब चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. जर, आपण प्रायमर नंतर लगेचच फाउंडेशन लावले, तर प्रायमर लावण्याचा काही उपयोग होणार नाही. फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो. भारतीय स्कीनटोन साधारणतः नॉर्मल, ड्राय, ऑयली, मिक्स, डार्क आणि लाइट अशा असतात. फाउंडेशनची शेड ही स्कीनटोन्स लक्षात घेऊन बनवल्या जातात. त्यामुळे सर्वात आधी फाउंडेशनची शेड निवडताना तुमच्या चेहऱ्याशी कोणती शेड ब्लेंड होईल ते पाहून घ्या. योग्य टोनचं फाउंडेशन खरेदी करताना सर्वात आधी आपल्या अंगठ्यावर किंवा हातावर थोडं फाउंडेशन लावून बघा. फाउंडेशन ही एक मलई पावडर आहे,जो आपण चेहेऱ्यावर किंवा मानेवर लावू शकतो. फाउंडेशनचा उपयोग चेहेऱ्यावरील पिंपल्स किंवा डाग लपवण्यासाटी केला जातो. फाउंडेशनला बॉडी मेकअप असेही म्हणतात. चेहेरेचा रंग वाढवण्यासाठी फाउंडेशनचा उपयोग केला जातो. ज्यामुळे आपली स्किन उजळून दिसते.
  • कॉम्पॅक्ट पावडर – सर्वप्रथम, हे समजून घ्या की तुमच्या कॉम्पॅक्ट आणि अर्धपारदर्शक लूज पावडरमध्ये फरक आहे आणि ते समान नाहीत. याला सेटिंग पावडर असेही म्हणतात. लूज पावडर तुमचा मेकअप सेट करण्यात मदत करते, तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि मेकअपला मॅट लुक देण्यास मदत करते. तर प्रेस्ड पावडर किंवा कॉम्पॅक्टचा वापर मेकअपला वेळोवेळी टच-अप देण्यासाठी आणि चेहऱ्यावर तेल किंवा चमक शोषण्यासाठी केला जातो. मेकअप सेट करण्यासाठी नेहमी सैल अर्धपारदर्शक पावडर वापरा ज्यामध्ये कोणताही रंग नसतो. याचा तुमच्या मेकअपच्या समाप्तीवर परिणाम होणार नाही. सैल पावडर लावण्यासाठी तुमच्या किटमधील सर्वात जाड आणि फ्लफी ब्रश वापरा. तुमच्या चेहऱ्याच्या ज्या भागात जास्त तेल येते त्या भागावर थोडी पावडर लावा, १० -१५ मिनिटे राहू द्या आणि नंतर ब्रशच्या मदतीने स्क्रब करा. कॉम्पॅक्ट पावडरचा उपयोग चेहरा सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी केला जातो. कॉम्पॅक्ट पावडर लावल्यांनतर ती तुमच्या त्वचेला नैसर्गिक सौंदर्य देते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार कॉम्पॅक्ट बाजारात वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध असतात.
  • आयलायनर – डोळ्यांच्या सौंदर्याला अजूनच खुलवतं ते म्हणजे आयलायनर. हे वेगवेगळ्या स्टाइल्सनी लावता येत असल्याने तुम्ही प्रत्येकवेळी आपल्या डोळ्यांना नवा लूक देऊ शकता. ह्यासाठी तुम्ही लिक्वीड किंवा पेन्सील आयलायनरचा वापर करू शकता. तसं तर सर्वात जास्त ब्लॅक आयलायनरचा वापर केला जातो. पण तुम्ही नेहमीपेक्षा हटके ब्लू, डार्क ग्रीन किंवा इतर ही कलर आयलायनरचा वापर करून नवा लूक ट्राय करू शकता. तसेच तुमच्याकडे काजळ असेल तर तुम्ही डोळ्यांसाठी काजळदेखील लावू शकतात.
  • लिपस्टिक – कोणताही मेकअप लुक लिपस्टिकशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. लिपस्टिक एका चुटकीसरशी तुमचा संपूर्ण लुक बदलू शकते. बोल्ड किंवा न्यूड, ग्लॉसी किंवा मॅट, तुमची निवड काहीही असो, लिपस्टिकचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. तुमच्या ओठांचा आकार अधिक सुंदर आणि स्वच्छपणे ठळक करण्यासाठी तुमच्या ओठांना कन्सीलरने लाइन करा. नेहमी लिप लाइनर आणि लिपस्टिकची एकच शेड निवडा नाहीतर मेकअपमध्ये मोठी चूक होऊ शकते. मेकअप अधिक काळ टिकण्यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर टिश्यू पेपर ठेवा आणि ब्रशच्या मदतीने लूज पावडर दाबा. नेहमी लिपस्टिक मधूनच लावायला सुरुवात करा आणि ती बाहेरून लावा.

हे ही वाचा:

नाश्त्यात बनवा चविष्ट आणि हेल्दी बेसनाचे अप्पे, अगदी सोपी रेसिपी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss