spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी काही खास आमंत्रण पत्रिका

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाची धामधूम यंदा जोरात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच आता घरगुती गणेशोत्सवामध्ये निर्बंधमुक्त वातावरणामध्ये यंदाचा गौरी-गणपतीचा सण पार पडणार आहे.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाची धामधूम यंदा जोरात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच आता घरगुती गणेशोत्सवामध्ये निर्बंधमुक्त वातावरणामध्ये यंदाचा गौरी-गणपतीचा सण पार पडणार आहे. अशामध्ये आता तुमच्या घरी नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तांना बाप्पांच्या दर्शनासाठी आमंत्रित करण्यासाठी निमंत्रण पाठवण्यासाठी फेसबूक मेसेजेस किंवा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस द्वारा मेसेज करू शकता.

यंदा गणपतीचं आगमन ३१ ऑगस्ट दिवशी होणार आहे. त्यानंतर घरातील रीतीभातीनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांचा गणपती घरांमध्ये तर १० दिवसांचा गणपती सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होतात. गौरी-गणपतीच्या सणामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यानुसार तुम्ही ही आमंत्रणं पाठवू शकता.

काही खास आमंत्रणे –

गणपती आमंत्रण पत्रिका ।
कोरोनाचे विघ्न दूर हारूनी
यंदा पुन्हा बाप्पाचा जयघोष करूया
आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की या !
पत्ता –
आरतीची वेळ –

 

सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या घरी
गौरी-गणपतीचे आगमन होणार आहे.
आपण बाप्पाच्या दर्शनाला येऊन
आमचा आनंद द्विगुणित करावा,
ही विनंती. 🙏
पत्ता –
आरतीची वेळ –
निमंत्रक-

llश्री गणेशाय नम:ll
!! श्री स्वामी समर्थ!!
सालाबाद प्रमाणे यंदाही “बाप्पा”चे आणि गौरी देवीचे आगमन आमचे घरी दि. ३१ – ०८-२०२२ ते ५ – ०९ – २०२२ पर्यंत आहे. दि. ०४ – ०९ – २०२२ सत्यनारायण पूजा आहे तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
पत्ता :-
आम्ही आपली वाट पाहत आहोत.
नम्र विनंती :-
मोबाईल नंबर –

 

सस्नेह निमंत्रण..!
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की,
यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक – ३१-०८-२०२२ रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :
मोबाईल नंबर –

 

गणेशोत्सव 2022 आग्रहाचं आमंत्रण..!
सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी बुधवार, दिनांक ३१-०८-२०२२ या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!

 

हे ही वाचा:

नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त

नोएडा ट्विन टॉवर्सची कथा’: सुपरटेक इमारती कशामुळे पाडल्या जाणार 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss