spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवसाला पावणाऱ्या बाप्पाची आज पहिली झलक दिसणार

मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण थाटामाटात साजरा करता आला नाही. परंतु यावर्षी सर्व निर्बंध हटविल्यामुळे गणेशोत्सव सण मोठ्या जलोषात सर्व ठिकाणी साजरा केला जाणार आहे.

मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण थाटामाटात साजरा करता आला नाही. परंतु यावर्षी सर्व निर्बंध हटविल्यामुळे गणेशोत्सव सण मोठ्या जलोषात सर्व ठिकाणी साजरा केला जाणार आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतीचा आगमन सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडला परंतु आता सर्वांचे डोळे हे ‘नवसाला पावणारा बाप्पा’ म्हणजेच लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले आहेत. परंतु आज भाविकांची हि प्रतीक्षा संपणार आहे.

ज्या क्षणाची सर्व भक्तगण आतुरतेने वाट पाहत आहेत, अशा ‘नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील ‘लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) मूर्तीची पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. (Ganeshostav 2022) त्यामुळे भाविकांची प्रतीक्षा संपणार आहे. आज सोमवार, दि. २९ ॲागस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन होणार आहे.

आज लाडक्या बाप्पाला डोळे भरून पाहता येणार आहे. त्यामुळे एक वेगळाच उत्साह या लालबाग परिसरात यावर्षी पाहायला मिळतोय. लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे. मागील दोन वर्षे गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे (Coronavirus) निर्बंध असल्याने लालबागचा दर्शन हजारो लाखो भाविकांना प्रत्यक्षात घेता आला नाही. मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येत आहे. यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येतोय, लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा ८९ वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे बुधवारी म्हणजेच, ३१ ऑगस्ट २०२२ ते रविवार ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत साजरा होणार आहे.

जून महिन्यात लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गणेशोत्सवाची चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते.

https://www.facebook.com/timemaharashtra

टाईम महाराष्ट्रसोबत पहा बाप्पाची ऑनलाइन झलक –

लालबागच्या राजाची पहिली झलक आज सर्वांना बघायला मिळणार आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाची आतुरतेने वाट पाहत असतात. हि झलक तुम्हाला टाईम महाराष्ट्रच्या फेसबुक पेजवर देखील बघता येणार आहे. आज सोमवार, दि. २९ ॲागस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन होणार आहे.

हे ही वाचा:

यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी काही खास आमंत्रण पत्रिका

जाणून घ्या… हरतालिका उपवासाचे महत्व

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss