spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या दोघांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या दोघांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. तसेच कोणत्याही प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती हि दिली नाही.

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा एक्टीव्ह झाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी केली. त्यामध्ये त्यांनी स्वतःचे नाव प्रथमतः नोंदवले. तेव्हा राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला प्राथमिक सदस्य करून घेतले. हे मी माझे भाग्य समजतो. या प्राथमिक सदस्यनंतर राज ठाकरेंनी दुसरा धक्का दिला आहे. तो म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा भेट घेतली आहे. २०१४ पासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सर्वश्रुत आहे. राज ठाकरे हे आपल्या वेगवेगळ्या भूमिका बदलत असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची त्यांची मैत्री कायम राहिली आहे.

याआधी परळजवळ राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. राज ठाकरे यांच्या बालपणीच्या मित्राच्या घरात हि भेट झाली होती. या भेटी नंतर राजकीय चर्चाना उधाण आले होते. आज मात्र राज ठाकरे हे सागर बंगल्यावर जाणून देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत अश्या स्वरूपाची माहिती हि मिळत आहे. या सर्व संबधी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर विचारले असता, अश्या प्रकारची भेट झाली नाही असे सर्व शासकीय कमर्चारी सांगत आहे. परंतु दुसरीकडे पोलीस खात्यात चौकशी केली तर राज ठाकरे हे सकाळी लवकर आपल्या निवस्थानातून बाहेर पडले होते अशी माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे यांच्या दिवसाची सुरवात लवकर होत नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा एक्टीव्ह झाले आहेत. त्याच सोबत पुण्याचा दौरा देखील केला होता. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जिथे जिथे शिवसेनाच प्रभाव आहे तेथील धक्का तंत्रासाठी देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची मदत पाहिजे आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना धक्कावर धक्का बसत आहेत. तर दुसरीकडे या सर्व गोष्टींचा फायदा राज ठाकरे यांनी उचलावा आणि एक तरी ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात चालू राहिला पाहिजे असे देवेंद्र फडणवीस यांचे मत आहे. राज ठाकरे यांच्या प्रयत्नातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीतून जर युतीमधील एखादा पक्ष होण्याचे संकेत देखील या भेटीमागे आहेत का ? हे आपल्याला येणाऱ्या पुढील काळात समजेल.

येणाऱ्या महानगरपालिकासाठी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांची युती असेल. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीनेच भाजपची सर्व जबाबदारी हि आशिष शेलार यांच्यावरदेखील असणार आहे. हि सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्र आहे हे आता सर्वांना समझलेचं आहे. त्याचबरोबरीने राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची हि मैत्री आहे त्याच सोबत राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची हि मैत्री आहे. त्यामुळे हे सर्व मित्र एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ठाण्यातून आणि मुंबईतून सत्तेवरून पायउतार करणार का ? या भेटीमध्ये नेमकी काय समीकरणे मांडली आहेत हे बघावे लागले. अत्यंत आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस हे कामाला लागले आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झाल्यामुळे भेटीमधून उद्धव ठाकरे याना नेमका कश्या स्वरूपाचा धक्का देता येईल याबाबतची संपूर्ण रचना देखील झाली नसली तरी सुमारे ५० मिनिटांची हि चर्चा चालू होती.

मुंबईमधील किमान १०० जागा ह्या राज ठाकरे लढणार आहेत. या १०० जागांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिंदे गट मनसेला ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावरून एक गोष्ट लक्षत येते जर शिवसेनेला धक्का देण्याची हि सर्व प्रक्रिया सुरु झाली आहे. गेली ३ दशके शिवसेनेचा भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर तर २५ वर्ष ठाणे महानगरपालिकेवर फडकत आहे. मुंबई महानगरपालिकेत मनसेचा १ नगरसेवक आहेय तर विधानसभेत एकमेव आमदार आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी ठरविले आहे कि एकला चलो करून पक्षाला फार काही उज्वल भवितव्य दिसणार नाही त. म्हणून या सर्व मित्रमंडळींना एकत्र घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांना त्यांच्या पक्षला मात देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत.

 

हे ही वाचा:

यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी काही खास आमंत्रण पत्रिका

गणेश चतुर्थी 2022: गणपतीला आवडणारे 5 पदार्थ 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss