spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lalbaugcha Raja First Look : घरबसल्या लालबागच्या राजाची पहिली झलक नक्की पहा

अवघ्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येणर आहे. त्याचबरोबर घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळांची सजावटीची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे. दरम्यान, आज नवसाला पावणारा बाप्पा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला लालबागच्या राजाचे पहिले मुखदर्शन घडले. लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक लालबागच्या राजाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे टाईम महाराष्ट्राच्या फेसबुकवर थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे.

अखेर लालबागच्या राजाची झलक भक्तांना पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील डोळे दीपतील असे लालबागच्या राजाचे सुंदर रूप पाहायला मिळाले. नितीन चंद्रकांत देसाई यांनी राम अयोध्येचा भव्य देखावा साकारला आहे. अयोध्येच्या या महालात सुंदर अशी लाइटिंग केली आहे. त्याचबरोबर ठीक ठिकाणी लाइटिंगचे झुंबर लावण्यात आले आहे. गणपतीच्या एका हातात सुदर्शन चक्र आहे. तर, एका हातात त्रिशूल आहे. लाल पितांबर मधील राजाचे हे रूप डोळ्याचे पारणे भेडणार आहे.

हेही वाचा : 

बाप्पासाठी पर्यावरणपूरक मखर

गेल्या दोन वर्षात संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत होता. या काळात एक सामाजिक संदेश आणि लोकांमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेश मंडळांने रक्तदान शिबिर आयोजित केले होते यात १२ हजार पेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत रक्तदान केले. त्याचप्रमाणे नागरिकांचे रक्षक म्हणजेच मुंबई पोलिसांनी कोरोना काळात जनतेची सेवा केली. दरम्यान, १११ पोलीस यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना सन्मान चिन्ह व एक लाखाची मदत करत आम्ही त्यांचे स्वागत केले.

बाप्पाच्या सुबक मुर्तीसह मखरदेखील एकाच छताखाली उपलब्ध

यंदा २०२२ मध्ये पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने आम्ही हा उत्सव जल्लोषात साजरा करणार आहोत. कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता कायदा व सुव्यवस्थेचा पालन करत आम्ही गणेश भक्तांचे सुरक्षित दर्शन घडवू. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची यंत्रणादेखील आम्ही तैनात केलेली आहे उदाहरणार्थ सीसीटीव्ही कॅमेरे त्याचबरोबर बॅक स्कॅनर अशा अनेक गोष्टी आमच्या सुरक्षा व्यवस्थेत असणार आहेत. लालबागचा राजा मंडळाचे पाच हजार सहकारी सदस्य हजर राहून संपूर्ण दहा दिवसात भाविकांच्या सुरक्षेतेची काळजी घेत असतात यात परिसरातील महिला वर्गांचा देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतो अशावेळी नागरिकांना किंवा भाविकांना कोणतीही असुरक्षितता आम्ही भासून देत नाही. अशी माहिती लालबाग राजाच्या सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss