spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवाजीपार्कमधील दसऱ्या मेळाव्याच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन म्हणाले…

पण, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

दरवर्षी शिवसैनिक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवाजी पार्कवरील हा दसरा मेळावा होणार की नाही आणि झाला तर तो ठाकरे गट घेणार की शिंदे गट घेणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवाजी पार्कवरील या दसऱ्या मेळाव्यावरून बरेच संभ्रम निर्माण झाले आणि त्यात महानगरपालिकेने उद्धव ठाकरेंनी शिवाजीपार्कसाठी दिलेला अर्ज मंजूर करण्यासाठी आखडता हाथ घेतल्यामुळे या संभ्रमांना अजूनच खात पाणी घातले जात होते. पण, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणताही संभ्रम नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी संभ्रम निर्माण करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरू केलेली आहे.”

“मुंबई महानगरपालिकेकडून येणाऱ्या परवानगीचा जो तांत्रिक मुद्दा असेल तो त्यांचा ते पाहतील. मात्र, शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावर म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने युती केली. आज संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले आहेत. हिंगोलीतील मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता हे रोजच चालू आहे.”

“मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आश्चर्यदेखील वाटतं. सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवत ही मंडळी शिवसेनेत येत आहे,” असं ठाकरे यांनी म्हटलं.

“भाजपाने आम्ही हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली होती. त्याला छेद देणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या घटना आहे. बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधव देखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात एक वेगळं चित्र निर्माण होत आहे आणि हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“अनेक विषय आहेत. त्यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तुर्त ज्यांना ज्यांना हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपण फसले गेलो आहोत असं वाटतं त्यांना मातोश्रीचे म्हणजे शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी केवळ शिवसेनेले भक्कम करण्यासाठी नाही, तर शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी एकत्र यावं,” असं आवाहनही ठाकरेंनी यावेळी केलं

हे ही वाचा:

घरबसल्या लालबागच्या राजाची पहिली झलक नक्की पहा

Lalbaugcha Raja First Look : घरबसल्या लालबागच्या राजाची पहिली झलक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss