spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे गटांकडून बीएमसी निवडणुकीसाठी नवीन शिलेदारांची निवड

नुकतेच राज्यात शिंदे आणि भाजप यांनी सरकार स्थापन केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या शिंदे गटाची नुकतीच एक बैठक हि पार पडली आहे.

नुकतेच राज्यात शिंदे आणि भाजप यांनी सरकार स्थापन केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या शिंदे गटाची नुकतीच एक बैठक हि पार पडली आहे.  यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या (Shinde Group) नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी पाच विभागप्रमुख तर तीन विभाग संघटकांना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही नव्या चेहऱ्यांना महत्त्वापूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून त्यांना पक्षविस्ताराचं काम सुरु करण्यास सांगण्यात आले.

या बैठकीला खासदार आणि शिंदे गटाचे सचिव राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव, सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, सचिव संजय मोरे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही चेहऱ्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक १० मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक ७ मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक ९ मधून माजी नगरसेवक मंगेश कुडाळकर यांची विभागप्रमुखपदी तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईत मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक १२ मधून दिलीप नाईक यांना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विभाग क्रमांक ९ येथून अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नव्याने या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

हे ही वाचा :- 

रिलायन्स एजीएम: 5G लाँचपासून JioAirFiber पर्यंत, अंबानींनी केलेल्या 5 मोठ्या घोषणा

‘जय भवानी जय शिवराय’ म्हणत ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss