spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वादग्रस्त ट्विट केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ‘या’ अभिनेत्याला अटक ?

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतो. के आर के सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत के आर के कोणत्या ना कोणत्या कलाकाराला ट्रोल करताना दिसून येतो. तो राजकीय मुद्द्यांवरदेखील आपले मत मांडून चर्चेत येत असतो. तो अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप वर निशाणा साधताना दिसतो. २०२० मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी मुंबई पोलिसांनी के आर के वर अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत. आपल्या परखड आणि सडेतोड प्रतिक्रियांसाठी ओळखला जाणारा कमाल राशिद खान अर्थात के आर केच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

सावधान ! बीटरूटचे सेवन या लोकांना फायद्याऐवजी नुकसान ठरू शकते

Latest Posts

Don't Miss