spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीस शिवतीर्थावर, भाजप आणि मनसेच्या सततच्या भेटीमागचं रहस्य काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. कालच (२९ ऑगस्ट २०२२) राज ठाकरे सकाळी अचानक मलबार हिल परिसरातील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याचे समजले. त्यानंतर आता भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत केलं. त्यानंतर राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची वैयक्तिक चर्चा होणार आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे हे मला मोठ्या भावासारखे असून, ते नेहमी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. राज आणि आमचे वैचारीक साम्यदेखील आहे. राज ठाकरे नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडत आले आहेत. तसेच रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणं गैर नाही. मनसे युतीचा निर्णय केंद्रातील वरिष्ठ नेते अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस आदी घेतात. त्यामुळे मनसे युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच घेतला जाईल असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले आहे. माझं, काम केवळ पक्ष कसा वाढेल आणि त्यासाठी काय काय करता येईल हे करणे आहे. असे बावनकुळे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’चा लवकरच पहिला टप्पा पूर्ण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ट्रायल रन

पुढे बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय की राज ठाकरे हे महाराष्ट्रांच, जनतेचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारे एक अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते एक फायटर आहेत. त्यांना मी याच दृष्टीकोनातून बघतो.”अशा पद्धतीत बावनकुळे यांनी ठाकरेंच कौतुक केलं.

मनसे आणि भाजपच्या नेत्यांची सतत भेट होत असल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवी समीकरणे जुळतात का याबद्दल चर्चा आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांना पूरक भूमिका बघायला मिळतात. हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली आहे. या आधी चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि मनसेच्या गोटात काही शिजतंय का? याची चर्चा रंगली आहे.

सर्वोच्च न्यायलयात आज एकूण ८ प्रलंबित खटल्यांवर दोन घटनापीठे सुनावणी होणार

Latest Posts

Don't Miss