spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणेश चतुर्थीला केवळ राम चरणच नाही तर अल्लू अर्जुनचीही क्रेझ, चाहत्यांनी केले पुष्पा राजने प्रेरित गणपतीचे स्वागत

.या वर्षी, असे दिसते की RRR मधील जनमानसातील लोकप्रिय पुरुष राम चरणचा उग्र रूप आणि अल्लू अर्जुनचा प्रतिष्ठित पुष्पा लूक देशभरातील कलाकारांसाठी प्रेरणा बनला आहे.

सध्या येणाऱ्या चित्रपटांमुळे दक्षिणेकडील कलाकार हे अधिकाधिक प्रसिद्ध होत आहेत. सध्याच्या घडीला आलेले दाक्षिणात्य चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत आणि रुपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरत आहेत. चित्रपटाच्या पात्रांपासून प्रेरित गणेशाच्या मुर्त्या बनवण्याच्या ट्रेंडची सुरुवात 2017 च्या बाहुबली चित्रपटापासून झाली आणि गेल्या दोन वर्षात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर आरआरआर तसेच अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा यांसारख्या चित्रपटांनी या ट्रेन्डला खूप उंचावर नेले. गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना विचाराला पोषक आहार देणारा बाहुबली एकमेव सुपरस्टार नाही, हे आता दिसून आले आहे . पुष्पा: द राइज रिलीज झाल्यापासून दक्षिणेकडील नायक अल्लू अर्जुनची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. या चित्रपटाने जनमानसात एक ट्रेंड निर्माण केला आहे ज्यामध्ये प्रत्येकजण केवळ बोलतच नाही तर चित्रपटातील पुष्पा राजची शैली देखील स्वतः आजमावून पाहत आहे. आता प्रसिद्ध गणपती उत्सव आला असल्याने पुष्पराज स्टाईलचा ज्वर गणपती मूर्तींलाही लोक डोक्यावर घेताना दिसत आहेत.

गणपती उत्सव हा जनतेमध्ये सर्वाधिक साजरा केला जाणारा उत्सव आहे. तर यावर्षी लोक पारंपरिक गणेश मूर्तींऐवजी गणपतीचे स्वागत करत असताना यावेळी पुष्पराज शैलीत मूर्तींचे आगमन झाले. काही ठिकाणी तर प्रसिद्ध पुष्पराज शैलीत विराजमान असलेल्या गणेशाच्या मूर्ती दिसल्या. अल्लू अर्जुनच्या क्रेझ आणि स्टारडमचं हे ठळक उदाहरण आहे. एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही स्टायलिश स्टारची क्रेझ कमी होताना दिसत नाही आणि नेहमीच आपल्या लोकप्रियतेची नवनवीन उदाहरणे निर्माण करत असतात हे पाहून आश्चर्य वाटते.

या वर्षी 31 ऑगस्ट रोजी येणारी गणेश चतुर्थी हा पश्चिम भारतातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी कारागीर गणपतीची पारंपरिक मूर्ती संपूर्ण भारतात पूजा करण्यासाठी तयार करतात आणि दरवर्षी ते गणपतीच्या मूर्ती कोरण्यासाठी विविध ठिकाणांहून प्रेरणा घेतात. या वर्षी, असे दिसते की RRR मधील जनमानसातील लोकप्रिय पुरुष राम चरणचा उग्र रूप आणि अल्लू अर्जुनचा प्रतिष्ठित पुष्पा लूक देशभरातील कलाकारांसाठी प्रेरणा बनला आहे.

हे ही वाचा:

मूर्ती विसर्जनातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागपूर खंडपीठाने करून घेतली याचिका दाखल

येणाऱ्या काळार हे सरकार लोकाभिमुक ठरेल – शहाजीबापू पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss