spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचे जिल्हा न्यायालयाने दिले आदेश

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi Case) कोर्टाकडून मोठा निर्णय देण्यात आला आहे.

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi Case) कोर्टाकडून मोठा निर्णय देण्यात आला आहे. हा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला आहे. कोर्टाने दिलेल्या निकालानुसार तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी जिल्हा कोर्टाने दिली आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात मशिदीच्या आजूबाजूला मंदिर परिसराचे अवशेष सापडले होते. त्यामुळेच आता व्यास कुटुंबीयांना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या मशिदीमध्ये आता पूजा केली जाणार आहे. जिल्हा न्यायालयाने असे आदेश दिले आहेत. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने हा निकाल देण्यात आला आहे.

हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले, आता व्यास कुटुंबीय तळघरात पूजा करणार आहेत. हिंदू पक्षाने व्यास कुटुंबीयांनी तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. १९९३ पासून व्यास कुटुंबीय तळघरात पूजा करत होते. त्यानंतर १९३३ मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. १७ जानेवारीला व्यासांच्या तळघराचा ताबा जिल्हा प्रशासनाने घेतला होता. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ ट्रस्ट कडून पूजा केली जाणार आहे.

वाराणसी कोर्टाच्या निकालानंतर नंदीच्या समोरून व्यासजीच्या तळघरात जाण्याचा मार्ग बनवण्यात येणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर ही कारवाई केली जाणार आहे. तसेच आता कोर्टाने सात दिवसांच्या आत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पूजेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी राखी सिंहच्या पुनर्विचार याचिकेवर ज्ञानवापी मशिदीच्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीला नोटीस बजावली आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss