अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी आणि सगळीकडेच खळबळ उडाली,याचबरोबर पूनमचा मृत्यू झाला समझल्यावर सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.वयाच्या ३२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.२९ जानेवारी पर्यंत पूनम सोशल मीडियावर अँक्टिव्ह होती.आणि अचानक तिच्या मृत्युची बातमी येणं ही खुप आश्चर्याची बाब होती.माक्ष पुनमच्या बाबतीत एक अपडेट समोर आलेली आहे,पुनमच्या एक्स बॉयफ्रेंडने केलेला दावा एकूण आता सगळेच हैराण झाले आहेत.
पूनमने आतापर्यंत अनेक मुलाखती दिल्या मात्र कोणत्याच मुलाखतीत तिने आपल्याला कॅन्सर असल्याचं सांगितले नसल्यामुळे अचानक तिच्या मृत्यूची बातमी आल्यामुळे अनेकांच्या मनात तिच्या मृत्यू होण्याचं नक्की कारण काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत.आता तिच्या निधनाच्या वृत्तानंतर आणखीही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
अभिनेत्री पूनम पांडेच्या मॅनेजरने सोशल मीडियावर ही दुःखद बातमी शेअर केली होती. एवढ्या कमी वयात अभिनेत्री हे जग सोडून गेल्याने सर्वांनाच वाईटही वाटले. पण, आता तिच्या निधनाच्या बातमीने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी आली पण तिच्या मृतदेहाचे काय? आतापर्यंत पूनम पांडेच्या मृतदेह समोर आलेला नाही.तिचा मृतदेह नक्की कुठे आहे,त्याची कोणतीच अपडेट अजून समोर आलेली नाही.
पुनम अंधेरी येथील लोखंडवाला भागात राहात होती. ती राहत असलेल्या परिसरातही तिच्या निधनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यास कोणीही तयार नाही. एवढेच नाही तर मुंबईतील वरळी येथे राहणाऱ्या पूनम पांडेच्या बहिणीचा मोबाईलही बंद आहे.शुक्रवारी सकाळी पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. ही पोस्ट पूनमच्या मॅनेजरने केली होती. पूनमचा मृत्यू सवाइकल कॅन्सरमुळे झाल्याचे त्यात लिहिले आहे. यानंतर अनेक चाहत्यांनी त्या पोस्टवर कमेंट केली. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही पूनमला श्रद्धांजली वाहिली आहे. पण असे असूनही तिच्या आईचा आणि बहिणीचा फोन बंद येत असल्याने वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे.
पूनमच्या ड्रायव्हरने ‘अमर उजाला’ला सांगितले, ‘काल संध्याकाळपर्यंत ती वांद्रे येथील फ्लॅटमध्ये होती आणि अचानक कुठेतरी बाहेर गेली. पूनमच्या एका मैत्रिणीने सांगितले की, तिला बऱ्याच दिवसांपासून ब्रेन ट्यूमरचा त्रास होता आणि आज सकाळी 7 वाजता कानपूरमध्ये तिचा मृत्यू झाला. त्याचवेळी पूनमचा एक्स बॉयफ्रेंड बिपिन हेडेकर म्हणतो की, पूनमला काहीही झालेलं नाही ,ती जिवंत आहे”.असा दावा तिच्या बॉयफेंडने केला आहे.त्यामुळे आता पुनमचा मृतदेह जो पर्यंत समोर येत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लावणं कठीण असल्याचं दिसत आहे.
हे ही वाचा:
बेकायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं सरकार सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी – Nana Patole
उल्हासनगर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर, केली मोठी घोषणा