spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनुष्का-विराट होणार दुसऱ्यांदा आई-बाबा,एबी डिव्हिलियर्सने व्हिडिओ शेअर करत दिली बातमी

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे नेहमीच त्यांच्या कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे नेहमीच त्यांच्या कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात.गेल्या काही दिवसांपासून अनुष्का देखील सिनेसृष्टीपासून लांब आहे.दरम्यान तिच्या बॉलीवूडपासून लांब राहण्याचे कारण समोर आले आहे.तस बघायला गेलं तर गेल्या काही दिवस अनुष्का-विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अशा चर्चाना खुप उधाण आलं होत,दरम्यान ह्या बातमीवर आता शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.विराट-अनुष्का खरोखरचं दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने गोड बातमी सांगितली आहे.मात्र अद्याप अनुष्का किंवा विराट कोहलीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण विराटचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू एबी डिव्हिलियर्सने अनिष्काच्या प्रेग्नंसीबाबत भाष्य केलं आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सचा  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. विराटसाठी कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. त्याने योग्य निर्णय घेतला आहे”. विराट आणि एबी डिव्हिलियर्स एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आहे.विराट-अनुष्काच्या घरी दुसरं बाळ येणार आहे. अनुष्का-विराट 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 2021 मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. नुकताच त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे. अनुष्काचा ‘चकदा एक्सप्रेस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अनुष्काच्या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

विरुष्काला काही दिवसांपूर्वी एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी पापराझींकडे त्यांनी फोटो लीक न करण्याची विनंती केली होती. तसेच आम्ही लवकरच यासंदर्भात घोषणा करू असं ते म्हणाले होते. त्यानंतर विरुष्काच्या घरी पाळणा हालणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

हे ही वाचा:

JEE Mains 2024 : परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात आले बदल, नोंदणी आणि तारखांबाबत घ्या सविस्तर जाणून…

‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss