spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानातील पूर परिस्थितीवर भारताच्या पंतप्रधानांनी केलं मोठे व्यक्तव्य

सध्या पाकिस्तानात महापुराचा हाहाकार चालू आहे पाकिस्तानाला आर्थिक परिस्थिती सोबत इतर समस्यांचा सामना देखील करावा लागत आहे पाकिस्तान मध्ये मुसळधार पावसाची सतत धार सुरू असून महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या घटनेमुळे पाकिस्तान मध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. या महापुरामुळे पाकिस्तान मध्ये आतापर्यंत लहान मुलांसह १००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानातील सध्याच्या परिस्थितीमुळे मोठी जीवितहानी झाली असून, वित्तहानी देखील झाली आहे. पाकिस्तान मध्ये आलेल्या या महापुरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विट नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शफीर यांनी त्यावर ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

हेही वाचा : 

त्वचा सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी करा “हे” घरगुती उपाय

“पाकिस्तानात पुरामुळे झालेल्या विध्वंस पाहून खूप दुःख झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या जखमी झालेल्या तसेच पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो, आणि परिस्थिती लवकर पूर्ण पदावर येईल अशी आशा करतो.” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला उत्तर देताना पाकिस्तानातील पंतप्रधान शहाबाद शरीफ म्हणाले की, “पाकिस्तानात पुरामुळे झालेले जीवित आणि सादर संपत्तीच्या नुकसानावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करीत दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपल्या विशिष्ट गुणांमुळे पाकिस्तानात जनता या संकटातून बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा जनजीवन व्यवस्थित होईल अशी आशा आहे.” असे शहाबाज शरीफ यांनी म्हटले.

राशी भविष्य १ सप्टेंबर २०२२, धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल

Latest Posts

Don't Miss