‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसून येत आहेत,माथेरानमध्ये हनिमुनसाठी गेलेल्या सायली-अर्जुनचं नातं आता हळुहळु फुलताना दिसून येत आहे.अर्जुन तर सायलीच्या प्रेमात पडला आहे. हे तर दिसून येत आहे.दरम्यान त्याच्या हनिमुनमध्ये अडथळे आणण्यासाठी प्रिया तिकडे गेलीच आहे.नवनवे कारस्थान प्रिया तिकडे रचताना दिसून येत आहे.
आता मालिकेतील पुढील भागात सायली आणि अर्जुन हॉटेलच्या पार्टीत सहभाग घेत डान्स करण्यासाठी जातात.त्यावेळी डान्स करताना अर्जुनच्या शर्टवर ड्रींक सांडतं. अर्जुन ते साफ करण्यासाठी जातो तेव्हा प्रिया वेष बदलून वेटर बनून येते. त्यावेळी अर्जुन आणि तिची भेट होताहोता राहते. ती सायलीसाठी ड्रिंक बनवते, ज्यात ज्युस कमी दारू जास्त असते. तिच्यासाठी काम करणाऱ्या वेटरला ती धमकी देते की हे ड्रिंक सायलीनेच प्यायले पाहिजे. सायलीदेखील तो ज्युस पिऊन टाकते. सायलीने नकळत दारू प्यायल्यानंतर तिला चक्कर आल्यासारखं वाटू लागतं.
सायलीने दारू प्यायल्याचं पाहून सर्वाधिक आनंद प्रियाला होतो. सायलीने बरळायला सुरुवात केल्यापासून प्रिया तिचा व्हिडिओ काढायला लागते. सायली आजुबाजूच्या लोकांशीही काहीही बोलू लागते, कोणाशीही गप्पा मारते आणि नेमका अर्जुन त्यावेळी तिच्यासोबत नसतो. सायली नशेमध्ये अर्जुन सर कुठे गेले असा सवाल करते. त्यावेळी तिथे उपस्थित एक व्यक्ती तिला विचारते की, ‘मिसेस सुभेदार तुम्ही तुमच्या नवऱ्याला सर का म्हणताय?’ मात्र सायली तोंडावर बोट ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार देते. तेव्हा प्रिया वेटरच्या हातून सायलीला आणखी एक ड्रिंक देते आणि तेही सायली पिऊन टाकते.
जेव्हा अर्जुन पार्टीच्या ठिकाणी परत येतो, तेव्हा त्याला सायलीने दारू प्यायल्याचं लक्षात येतं. ती त्याच्याशी बोलतानाही दारूच्या नशेत काहीही बरळते. तो तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, अर्जुनची काहीशी चिडचिड होते, पण तो सायलीला सांभाळत असतो.सायलीला सावरणं त्याला काहीस कठीण जात होतं.हा पुढील भागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अर्जुन चक्क तिला हातगाडीवरुन आणतो, तिथेही सायली नाचत असते. शेवटी जेव्हा ते त्यांच्या खोलीत पोहोचतात, तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहून त्याच्या प्रेमाची कबुली देतो, मात्र सायली तेव्हा शुद्धीत नसते. तो म्हणतो की, ‘आज नवीन अवतारात खूप गोड दिसत होता. मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली, I am in love’. मात्र आता सायली शुद्धीत नसताना अर्जुनने प्रेम व्यक्त केलं आहे.पण सायली शुद्धीत असता कधी अर्जुन त्याचं सायलीवरचं प्रेम तिच्या समोर व्यक्त करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही चांगलेच उस्तुक आहेत
हे ही वाचा:
सोनम कपूरचा ऑफ शोल्डर ड्रेसमधील ग्लॅमरस लूक
राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर मी…काय म्हणाले Raj Thackeray?