spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रेम व्यक्त करताना देणाऱ्या गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा आहे वेगळा अर्थ,जाणुन घ्या

गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतिक मानलं जात.गुलाब हे फुल प्रेमाची कबुली देताना प्रत्येक जण आपल्या प्रियकरला किंवा प्रियसीला देत असतात.

गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतिक मानलं जात.गुलाब हे फुल प्रेमाची कबुली देताना प्रत्येक जण आपल्या प्रियकरला किंवा प्रियसीला देत असतात.आता फेब्रुवारी महिना आला तर सगळीकडे प्रेमाचे रंग दिसून येत असतात.आता ७ फेब्रुवारी पासून डे सुरु होतात.तर दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो.व्हॅलेंटाईन आठवडा एक आठवड्यापूर्वी सुरू होतो, ज्यामध्ये प्रत्येक दिवस खास असतो.सध्या हे सगळे डे साजरे करण्याचे फ्याडचं आले आहेत.आणि सोशल मीडियावर आपलं प्रेम दाखवण्यासाठी देखील सगळे उस्तुक असतात.पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. तसेच वेगवेगळ्या रंगांचे गुलाब देऊन तुम्ही तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे हे अनेकांना माहीत असेल.पण गुलाबाचे अनेक रंग आहेत,आणि प्रत्येक रंगाचे वेगवेगळे अर्थ देखील आहेत.दरम्यान  पिवळे, केशरी आणि गुलाबी गुलाब कोणाला दिले जातात आणि प्रत्येक रंगाचा अर्थ जाणून घेऊया.

लाल गुलाब

लाल गुलाब हा प्रेमाचे प्रतिक म्हणुन आपल्या प्रिय व्यक्तीला दिला जातो.लाल गुलाब देत आपण आपल्या पार्टनरसमोर प्रेम व्यक्क करत असतो. लाल गुलाब हा प्रेम, उत्कटता आणि भावनांशी संबंधित असल्याचे मानले जाते. लाल गुलाबाची खासियत म्हणजे तो देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देऊ शकता

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब फक्त सुंदर दिसत नाही, तर त्याच्या रंगालाही विशेष अर्थ आहे. गुलाबी रंगाचे गुलाब हे तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला देऊ शकता. तसेच जर एखाद्या व्यक्तीचे तुम्हाला आभार मानायचे असतील तर तुम्ही गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता.

पिवळा गुलाब

रोज डे च्या दिवशी पिवळे गुलाबही देऊ शकता. पिवळे गुलाब हे मैत्रीचे प्रतीक आहे. हे गुलाब देऊन तुम्ही मैत्री करु शकता. ज्या व्यक्तीशी तुम्हाला मैत्री करायची आहे, त्या व्यक्तीला पिवळ्या रंगाचे गुलाब देऊन माझ्याशी मैत्री करशील का अशी विचारणा करु शकता.

केशरी गुलाब

या रंगामागे देखील एक सुंदर असा अर्थ दडला आहे. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीसोबत मैत्रीच्या एक पाऊल पुढे जायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ऑरेंज रंगाचे गुलाब देऊ शकता.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray यांना BJP ने घेरलं, फोटो ट्विट करत म्हणाले…

ठरलं तर मग मालिकेत रोमॅंटिक वळण,अर्जुन पडलाय मिसेस सायलीच्या प्रेमात ,मान्य केलं प्रेम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss